नागपूर :- हलबा समाज महासंघाच्या वतीने नुकत्याच झालेल्या 16 एप्रिल रोजी रविवारी दिनदयाल नगर येथे हलबा समाजातर्फे जुनी मंगळवारी ढीवर मोहल्लात सार्वजनिक प्याऊच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी दे. बा. नांदकर तर महासंघाचे महासचिव वि.ना.धकाते, उपाध्यक्ष चंद्रकात बरडे संघटन सचिव रघुनंदन पराते आणि सदस्यगण रमेश वरुडकर व मनोज हेडावू तसेच परिसरातील बरीच प्रतिष्ठित मान्यवर मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होते. मागील ८ वर्षापासून हा उपक्रम राबवित असून ही संस्था समाजातील लोकांना सेवा देण्याचा नित्यनेमाने कार्यक्रम राबवित असतात. सार्वजनिक प्याऊचा उपयोग परिसरातील व रस्त्यावरून येणाऱ्या जाणऱ्या प्रवासांना उन्हाळ्याच्या दिवसात प्याऊ या लाभ घेतील. ही जागा गणेश चुनाखाये यांनी उपलब्ध करून दिली आहे. महासचिव धकाते यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
हलबा समाज महासंघाच्या वतीने जुनी मंगळवारी ढीवर मोहल्लात सार्वजनिक प्याऊचा शुभारंभ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com