क्रांतीज्योती सावित्रीबाईचा आदर्श ठेऊन समाजात महिलांनी जागृती करावी – ॲड.नंदा पराते

नागपूर :- हलबा समाज सांस्कृतिक मंडळच्या माध्यमाने बेसा येथील यशवंत महाविद्यालयाच्या प्रागंणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्याने जागतिक महिला दिन महिला मेळावा संपन्न झाला. महिला मेळाव्याच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मान्यवरांनी माल्यपूर्ण करून अभिवादन केले.जागतिक महिला दिनच्या मेळावात महिलांच्या मोठया सहभागाने महिला मेळावा पार पडला. मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्या व प्रदेश सरचिटणीस ॲड. नंदा पराते ह्या प्रमुख अतिथी तर अध्यक्ष म्हणून इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. त्रिलोत्तमा पराते आणि प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक यशस्वी नंदनवार,सामाजिक कार्यकर्त्या रेखा निमजे ह्या मंचावर होत्या. महिला मेळाव्यात हलबा समाजावरील अन्यायाविरोधात महिलांनी समाज जागृतीचे कार्य केल्याने एकता निर्माण होईल असे मत मंचावर उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केलीत .

महिला मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्या व सरचिटणीस ॲड. नंदा पराते म्हणाल्या की अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीने केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. महात्मा जोतिबा फुले यांच्या अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने क्रांतीसूर्य जोतिबा फुलेच्या पार्थिवाला अग्नी दिला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी यशवंतचा विवाह करून महाराष्ट्रात पहिला आंतरजातीय विवाह झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांचा मागे एक स्त्री म्हणून कणखर उभी राहून समाजात जागृत करण्याचा वारसा समोर नेला. आता महिलांनी चूल व मूल न करता सामाजिक न्यायासाठी समाज जागृतीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेऊन महिलांनी कार्य करावे.

महिला मेळावाचे प्रस्तावना पुष्पलता बहारघरे व संचालन अर्चना हेडाऊ,सारिका निनावे यांनी केले तर आभार प्रर्दशन ममता सोनकुसरे यांनी केले. महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रामाजी नंदनकर व ताराचंद बहारघरे, बबन हेडाऊ,आकाश पौनीकर, ललिता नंदनवार,तारा खरबीकर,रुपाली खडगी,अनिता हेडाऊ,उषा निनावे,उषा पौनीकर,कमल कुंभारे,लता निनावे यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजधानीत 12-13 मार्च रोजी महिला चित्रकार मनाली बोंडे यांचे वसुधैव कुटुंबकम चित्र प्रदर्शन 

Mon Mar 11 , 2024
नवी दिल्ली :- विविध देशांच्या संस्कृती आणि कथांवर आधारित छायाचित्र प्रदर्शन प्रथमच राजधानीत भरवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली आणि त्रिवेणी चॅरिटेबल फाऊंडेशन अमरावती, यांच्या वतीने अमरावती येथील प्रसिद्ध युवती चित्रकार मनाली अनिल बोंडे यांच्या वसुधैव कुटुंबकम या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन 12 आणि 13 मार्च 2024 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com