नागपूर :- नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील (RPTS) अकराशे महिला पोलीस प्रशिक्षणार्थ्यांकरिता अनिमिया रक्तचिकित्सेसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला पोलीस प्रशिक्षणार्थींसाठी भारत विकास परिषद – विदर्भ प्रांतातर्फे आयोजित हे शिबिर पोलिस प्रशिक्षण केंद्रात (RPTS) २५ आणि २६ मे रोजी होईल… केंद्र सरकारच्या आवाहनानुसार ॲनिमियामुक्त भारताच्या निर्मितीसाठी भाविपच्या विदर्भ प्रांताने हा पुढाकार घेतला आहे… शिबिरात ॲनिमिया चिकित्सेसोबत ऐच्छिक रक्तदान शिबिरही होईल .
एवढ्या मोठ्या संख्येचा सहभाग असलेले हे अशा प्रकारचे पहिलेच आयोजन आहे… RPTS चे प्राचार्य पाटील व उपप्राचार्य कुलकर्णी यांच्यासह भाविपचे विदर्भ प्रांत अध्यक्ष पद्माकर धानोरकर, सचिव सीमा मुनशी, विभाग प्रमुख सारिका पेंडसे यांच्यासह भाविपचे सर्वकार्यकर्ते या शिबिराच्या यशस्वीतेकरीता प्रयत्नशील आहेत…