महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

मुंबई :- महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज स्वीकारली. यावेळी बालविकासचे उपायुक्त राहुल मोरे, प्रशासन विभागाच्या उपायुक्त वर्षा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. नारनवरे यांचे स्वागत केले. नारनवरे हे प्रशासन सेवेतील 2009 तुकडीचे अधिकारी आहेत.

डॉ. नारनवरे यांनी सांगली येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद व पालघरचे जिल्हाधिकारी आणि सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यासारखी पदे भूषवली आहेत.

जनतेप्रती प्रशासनात संवेदनशीलता निर्माण करणे, उत्तरदायित्वाची भावना निर्माण करून प्रशासन अधिक जलद करणे हे उद्द‍िष्ट्ये ठेवून डॉ. नारनवरे यांची कार्यप्रणाली राहिलेली आहे.

यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश जवादे, उपसंचालक सुचिता साकोरे, सहाय्यक आयुक्त मनीषा बिरारीस, सहाय्यक आयुक्त ममता शिंदे, परीविक्षा अधीक्षक दत्तात्रय मुंडे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, सांख्यियिकी अधिकारी प्रमोद निकाळजे, झुंबर जाधव, अश्विनी कांबळे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल करताना मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक - राज्यपाल रमेश बैस

Tue Jul 11 , 2023
– राज्यपालांच्या हस्ते मुंबई व नोएडा टांकसाळीतील नाण्यांवरील पुस्तके प्रकाशित मुंबई :-  वेगवेगळ्या राजवटीत जारी केलेले चलनी शिक्के त्या – त्या काळातील घटनांवर व इतिहासावर प्रकाश टाकतात. भारताचा मुद्रा शास्त्रीय ठेवा देशाइतकाच प्राचीन आहे. आज देश कॅशलेस व्यवहारांकडे वाटचाल करताना देशाचा मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक आहे. इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने प्राचीन नाण्यांचे दस्तऐवजीकरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com