रेल्वेच्या शौचालयात बंद महिलेची सुटका

-बागमती एक्सप्रेसमधील घटना

-आरपीएफच्या प्रयत्नाने पडली बाहेर

नागपूर :-रागाच्या भरात घरून निघालेली एक महिला शौचालयात लपली. मात्र, शौचालयाचे दार लॉक झाल्याने प्रवाशांनी आरडा ओरड केली. आरपीएफच्या मदतीने महिलेला बाहेर काढण्यात आले. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर बागमती एक्सप्रेसमध्ये घडली.

सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार 40 ते 45 वयोगटातील एक महिला कौटुंबिक कलहातून घरून निघाली. मुलीसह ती एस-2 कोचमधून प्रवास करीत होती. एका व्यक्तीला पाहताच तीने स्वतला रेल्वेच्या शौचालयात बंद करून घेतले. शौचालयाचे दार लॉक झाल्याने इच्छा असूनही तिला बाहेर पडता आले नाही. प्रवाशांनी आरडा ओरड केली. आरपीएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. बर्‍याच प्रयत्नानंतर महिलेला बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले. या घटनेमुळे बागमती एक्सप्रेस आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा 20 मिनीट उशिरा प्रस्थान झाली. यानंतर ती मुलीसह स्टेशन बाहेर पडली.

आरपीएफकडून मिळालेल्या माहिती नुसार एक व्यक्ती आरपीएफ ठाण्यात आला.ओळखपत्र दाखविले आणि आर्मिचा जवान असल्याचे सांगून त्याची काकू रेल्वेच्या शौचालयात बंद असल्याची माहिती दिली.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Delice Bakery in Civil Lines accused of selling a rotten cake!

Thu Feb 2 , 2023
Nagpur : The Civil Lines-based Delice Bakery in Nagpur has bben accused by a customer of allegedly selling a stale and rotten cake. According to the customer, he purchased cherry cocoa cake item from Delice located in Civil Lines around Janury 28. “They sold cake in 1+1 Free offer but they did not explain a best before use date or […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com