हायटेक कामकाज व नव्या सुविधांसह उद्यापासून हिवाळी अधिवेशन.

अध्यक्ष नार्वेकर व उपसभापती गोऱ्हे यांनी घेतला आढाव

नागपूर, दि. 18 : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सत्राला उद्या दि. 19 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. सभागृहातील सर्व सदस्यांना नव्या लॅपटॉपसह, वायफाय व अन्य विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सत्रातील उपलब्ध सुविधांबाबतचे नवे कोरे ॲप तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक सदस्यांकडे उपलब्ध केलेली डीजीटल माहिती पुस्तिका यामुळे यावेळेचे अधिवेशन अधिक हायटेक व नवीन सुविधांसह सुरू होत आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या बैठकीला विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह विधिमंडळ सचिवालय,संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विधानभवन परिसर आणि बाहेरील व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. ट्रॅफिक आणि पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. विधिमंडळ परिसर आणि शहरातील महत्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. महिला पोलिसांसाठी विशेष काळजी घेण्यात आली असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले.

महिला आमदारांसाठी विधानभवनात शिशू संगोपन कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले. यावेळी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिला पोलिसांच्या सोयीसुविधा तसेच खासगी वाहनांच्या दर नियंत्रणाबाबत निर्देश दिले. याशिवाय विधानसभा अध्यक्ष यांनी केलेल्या सूचनेनुसार पत्रकारांसाठी अतिरिक्त कक्ष उभारण्यात आला आहे. इलेक्ट्रानिक्स माध्यमांसाठी वेगळी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी येण्यासाठी व जाण्यासाठी रेल्वे आणि विमान प्रवासासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी केल्या. विमानाच्या अतिरिक्त फेऱ्या सुटीच्या दिवसांमध्ये वाढविण्याची सूचना त्यांनी केली. रेल्वे अधिकाऱ्यांकडून त्यांना रेल्वेच्या परतीच्या प्रवासाची माहिती घेतली.

नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सेटट्राईब ह्या आयटी कंपनीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “महा असेंम्बली” ह्या ॲप चे सादरीकरण यावेळी करण्यात आले. ह्या ॲपद्वारे सर्व मंत्री, आमदार, सचिव स्तरावरील पदाधिकारी यांना अधिवेशनादरम्यान त्यांची निवास व्यवस्था, अधिवेशन दैनंदिनी, महत्वाच्या व्यक्तींची टेलिफोन निर्देशिका, इतर महत्वाचे सहाय्य, विविध बैठकांचा तपशील एका क्लिक वर मिळू शकणार आहे. अँड्रॉइड ॲप, वेब व्यू तसेच ॲपल स्टोरवर हे ॲप उपलब्ध असणार असून फक्त अधिकृत वापरकर्त्यानाच अर्थात सदस्यांनाच या ॲपचा एक्सेस असणार आहे.

याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थळदर्शक गुगल नकाशा असलेली माहिती पुस्तिका प्रत्येक सदस्यांच्या कक्षामध्ये व स्विय सहाय्यकांकडे उपलब्ध करुन दिली आहे. डिजीटल हाऊस किपींग, कपडे धुणे, भोजन सेवा, मदतनीस सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. याशिवाय निवास व अन्न बाबतीत असणाऱ्या कोणत्याही तक्रारीचा निपटारा 15 मिनिटात करण्याची तयारी विभागाने ठेवली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Maha Metro All Time High Ridership 1,60,000 (Expected) Today (1,56,789)till 9 pm

Sun Dec 18 , 2022
NAGPUR : Just a week after two lines of Maha Metro were inaugurated on 11th December, Maha Metro has another feather to its cap – the Ridership on Sunday was 1,60,000 (Expected). The number of passengers travelled by Metro on all the four Reach till 9 pm were 1,56,789 In fact, the trend of increasing ridership was witnessed the day […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com