अमृत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई :- केंद्र शासनामार्फत अमृत योजना 2 ला निधी देण्यात येतो. हा निधी त्वरित मिळावा, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य सुलभा खोडके यांनी अमृत 2 योजनेंतर्गत करावयाची कामे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले की, राज्यात केंद्र पुरस्कृत अमृत – 2 अभियानाची अंमलबजावणी 14 जुलै 2022 पासून करण्यात येत आहे. अमरावती शहर पाणी पुरवठा प्रकल्पाच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेमार्फत केंद्र शासनाच्यसा अमृत – 2 अभियानाच्या पोर्टलवर प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाकडून या अभियानासाठी निधी न आल्यास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत गठीत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीसमोर सादर करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राहुल गांधींच्या समर्थनार्थ कांग्रेसने जाळला मोदींचा प्रतिकात्मक पुतळा

Sat Mar 25 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सुरतच्या कोर्टाकडून कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सूनवल्यानंतर लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ कामठी शहर कांग्रेस रस्त्यावर उतरली असून या कृतीचा निषेध करीत आज 25 मार्च ला कामठी शहर कांग्रेस कमिटी कार्यालय समोर शहराध्यक्ष कृष्णा यादव यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. गुजरात निवडणुकीच्या दरम्यान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com