मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज गोंदिया आणि नागपूर जिल्हा दौरा

नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.

सकाळी दहा वाजता गोंदिया विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी दहा वाजून 55 मिनिटांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती. सकाळी 11 वाजता उपराष्ट्रपती महोदयांसमवेत डीबी सायन्स कॉलेज गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता उपराष्ट्रपती महोदयासमवेत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व नामवंत व्यक्तींना सुवर्णपदक पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. दुपारी १ वाजता उपराष्ट्रपती महोदयासमवेत मोटारीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदियाकडे प्रयाण. दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी मोटारीने गोंदिया विमानतळाकडे प्रयाण. दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी गोंदिया विमानतळ येथे आगमन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने रामगिरी निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी तीन वाजून २० मिनिटांनी रामगिरी निवासस्थान येथे आगमन व राखीव. सायंकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी मोटारीने रामटेककडे प्रयाण. सायंकाळी सहा वाजता नेहरू मैदान रामटेक येथील शिव संकल्प अभियान कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती. सायंकाळी साडेसात वाजता मोटारीने नागपूर विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी नागपूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लक्ष्मीनगर मधील सिमेंट रस्ते बांधकामाचे भूमिपूजन

Sun Feb 11 , 2024
नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निधीतून माजी महापौर संदीप जोशी यांच्या प्रयत्नाने लक्ष्मीनगर मधील मंजूर सिमेंट रस्त्यांच्या कामाचे शनिवारी (ता.10) मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सायंटिफिक सोसायटीचे अध्यक्ष विजय गडकरी, श्री सिद्ध हनुमान मंदिराचे सचिव शेखर कपले, वासुदेव अत्रे यांनी कुदळ मारून विविध सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी माजी महापौर संदीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com