अमृत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई :- केंद्र शासनामार्फत अमृत योजना 2 ला निधी देण्यात येतो. हा निधी त्वरित मिळावा, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य सुलभा खोडके यांनी अमृत 2 योजनेंतर्गत करावयाची कामे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले की, राज्यात केंद्र पुरस्कृत अमृत – 2 अभियानाची अंमलबजावणी 14 जुलै 2022 पासून करण्यात येत आहे. अमरावती शहर पाणी पुरवठा प्रकल्पाच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेमार्फत केंद्र शासनाच्यसा अमृत – 2 अभियानाच्या पोर्टलवर प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाकडून या अभियानासाठी निधी न आल्यास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत गठीत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीसमोर सादर करण्यात येईल.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com