संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- मोठा सारस पक्षी पिपरी मार्गावर कचाडयात पडुन असल्याची माहीती डॉ. महेश कापगते व सुहास पुंड यांनी वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी कन्हान चे शेखर बोरकर व त्यांच्या चमुंनी घटना स्थळी पोहचुन पाहणी करून बेसुध्द सारस पक्ष्याला पुढील उपचारास टीटी सेंटर नागपुर च्या पथकास सुपुर्त करून सारस पक्षाला दिले जीवनदान.
वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी कन्हान यांची ओळखच वेगळी पुन्हा एकदा मूक्या जीवाचं रक्षण करित दिला मानवतेचा संदेश कन्हान चे डॉ. महेश कापगते व सहकारी सुहास पुंडे यांना कुणीतरी फोनवर संपर्क साधुन मोठा पक्षी पिपरी मार्गांवर कचाड्यात पडुन असल्याची माहिती दिल्याने त्यांच्या प्राणी दवाखानात व्यवस्था नसुन कन्हान येथे पक्षी उपचार केंद्र नसल्याने त्यानी वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी कन्हान चे प्रमुख सदस्य प्राणी रक्षक मित्र चंद्रशेखर बोरकर यांना फोनव्दारे संपर्क करून माहिती दिल्याने प्राणी मित्र चंद्रशेखर बोरकर यांनी तात्काळ वन्यजीव प्राणी मित्रांच्या सहका-यासह घटनास्थळी पोहचुन सारस पक्षी असल्याची ओळख करत संपुर्ण पाहणी करून अनुमान लावला की, भुकेने तसेच अर्धांन्गवायु चा झटका असल्याच निर्देशनास आल्याने सारस पक्षी बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्वरित प्राणी दवाखाना कन्हान येथे आणुन आपल्या शहरात पुढील उपचार नसल्यामुळे ” ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर ” सेमनेरी हिल्स नागपुर यांचे सोबत संपर्क साधुन उपचारास त्यांची पशु-पक्षी वनविभागाची गाडी आल्यावर टीटी सेंटर नागपुर चे अधिकारी चौखराज बहेकर यांच्या पथकास पुढील उपचारा करिता सारस पक्ष्याला सुपृत केले. या वेळी वाईल्ड लाईफ वेल्फेयर सोसायटी प्रमुख प्राणी-पशु-सर्प मित्र चंद्रशेखर बोरकर, बबलु मुलुंडे, आशिष मेश्राम, सूरज ठाकरे सह सामाजिक कार्यकर्ते रजनीश मेश्राम हयानी प्रामुख्याने उपस्थित राहुन मदत कार्य केल्याने या सर्वाचे नागरिकां व्दारे कन्हान शहरात कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.