-गुन्हा दाखल होण्यास अकरा महीने का लागलेत ? असा प्रश्न पत्र परिषद मध्ये केला गेला
या प्रकरणात जाँच अधिकारी व सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांची निलंबनाची मागणी
नागपूर :- नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रशांत ठाकरे यांनी भूषण मुसरे आत्महत्या प्रकरणांमध्ये पत्रकार परिषदेमध्ये मुसरे परिवाराला घेऊन न्यायाची मागणी करित ११ महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला असून गुन्हेगाराला अद्यापही अटक केली नाही याला कारणीभूत सावनेरचे पोलीस निरीक्षक मारोती मुळक आणि आयोग अधिकारी शिवाजी नागवे जबाबदार आहे ? याकरिता या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करून त्यांच्यावर कठोर कारवाई व त्यांचे निलंबन करण्याची मागणी परिषदेमध्ये केली.
मृतक भूषण मूसरे यांनी १७ मे २०२२ रोजी, 2 लाख रुपयामुळे आत्महत्या केली याला जबाबदार रोहित बरगट आहे. असे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते. तरीही या प्रकरणात दिरंगाई का ? :
चीचपुरा सावनेर येथील संकेत लॉज बस स्टॅन्ड सावनेर येथे 17 मे 2022 रोजी चे आत्महत्या प्रकरण :
या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे. अशी मागणी मृतकांच्या परिवारांनी पत्र परिषदेत केली आहे.
पत्रपरिषद मध्ये प्रशांत ठाकरे जिल्हा महासचिव सावनेर, जिल्हा सचिव दिलावर शेख सावनेर, कालुराम मुसरे (वडील) पुष्पा मुसरे (आई) आणि मृतक भूषणची पत्नी प्रगती मुसरे यांची मंचावर उपस्थिती होती.