अनियंत्रित वाहतुकीवर ब्रेक कोणाचा ? 

– बेशिस्त पार्किंग वाहतुकीस अडसर 

कन्हान :- नगर परिषद कन्हान पिपरी हद्दीत पार्किंगसाठी कुठेही उपयोजना नाही. नागपूर-जबलपूर महामार्गाच्या मध्यभागी कन्हान शहर आहे. कन्हान शहारातून नागपूर-जबलपूर येण्या-जाण्या करिता ह्या मार्गांवरील मोठया प्रमाणात वाहनांचे वर्दळ असते.

गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असतांन विकास संथगती आहे. विकासाची गती वाढावी, करीता ग्रामपंचायतचे नगरपरिषद मध्ये रूपांतर झाले.आणि 9 वर्ष ही झाले. पारशिवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद नगरी हे परिसरातील नागरिकांसाठी मोठी बाजारपेठ आहे.

या महामार्गावरील कन्हान शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्हीं बाजूला बाजारपेठ आहे. बाजारपेठ मध्ये खरेदी करीता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना करीता त्यांचे वाहन पार्किंग करीता कन्हान नगर परिषद ने पार्किंगची कुठेही व्यवस्था केलेली नाही. परिणामी वाहन चालक आपले वाहन कुठेही मनमर्जीपणाने वाहने पार्क करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे.

शहरातील बाजारपेठ मुख्य रस्त्यांच्या आजूबाजूला दुकाने आहेत. आणि विशेष म्हणजे साप्ताहिक बाजार शुक्रवारी रोजी रस्त्याच्या दोन्हीं बाजूला बाजार भरतो. त्यामूळे भाजी विक्रेते, पानटपऱ्या, इतर व्यवसायांनी 500 ते 700 भाजीविक्रेत्यांची दुकाने महामार्गावर लागत असतात. त्यामुळे रस्ते अरुंद होते. वाहनेही रस्त्यावरच उभे करतात या बाजारात जवळपास 30 गावाचे बाजारपेठेत येण्याकरीता चहुबाजूने रस्ते आहेत, मात्र हे चारही रस्त्यांवर पानटपऱ्या व इतर किरकोळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणाने व्यापले आहेत. कन्हान नगरीत प्रवेश करताच दोन्ही बाजूंनी अतिक्रमित दुकानांचे दर्शन आणि वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नाहीं,त्यामुळे वाहन अनियंत्रण झाले की मोठ्या अपघात होऊ शकतो व नागरीकांचे अपघातात मृत्यू होऊ शकतो. होते. त्यामुळे बाजारपेठेत ये-जा करण्यास चारचाकी ते दुचाकी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. कठीण परिस्थितून वाहन बाजारपेठेत आलेच तर ते कुठे उभे करावे ? हा प्रश्न वाहनधारकाला पडत असतो. काही व्यवसायी तर दुकानांसमोर आपली गाडी उभी करुन भाजी विक्री किंवा ग्राहक ती खरेदी करीत असतात.

शासकीय कार्यालय पार्किंगसाठी कुठेही उपयोजना नाही

नगर परिषद कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरण कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कन्हान पोलिस स्टेशन, भारतीय स्टेट बँक कन्हान असो किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, तारसा रोड चौक, परिस्थितीही गंभीर आहे. पार्किंगची कुठेही व्यवस्था केलेली नाही.

त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत, असून रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

पार्किंग व्यवस्थेअभावी ही समस्या आणखी बळावल्याचे दिसत आहे. दिवसभर रस्त्याच्या दोन्ही बाजू वाहनांनी व्यापलेल्या असल्याने पादचाऱ्यांनाही अडचण होत आहे. या मार्गावरील अनेक ठिकाणी वाहनांचे कायमस्वरूपी स्टॅण्ड बनले असून पर्यावरण, प्रदूषण आणि आवाजामुळे परिस्थिती बिकट आहे. पार्किंगअभावी वाहतूक पोलिसही कारवाई करण्यास टाळाटाळ करतात.

कन्हान नागपुर – जबलपुर मार्गावर वसलेले नगर आहे शिवाय स्थानिक तारसा चौकातुन गोंदिया , रायपुर कड़े जाण्याचा मार्ग असून चौक नेहमी वाहनानी भरलेले असते विशेष : हा चौक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयाकड़े जाण्यासाठी वापरतात ज्यामुळे नोकरीपेशा व्यतिरिक्त विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित असतात . या चौकात एक पोलिस चौकी होती पण ती महामार्ग निर्माण मुळे तोडण्यात आली ज्या मुळे आता ट्रैफिक पोलिसांची कमतरता जाणवत आहे.

सदर चौकात या अगोदर झालेल्या विद्यार्थी सह इतर अपघातामुळे सुद्धा हा चौक नेहमी चर्चेत राहतो तसेच चौकाला ट्रैफिक पोलिसांची आवश्यकता मोठ्या अपघाताची शक्यतेवर आळा घालण्यासाठी आहे स्थानिक चौकातच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आहे ह्या कड़े त्यांनी विशेष लक्ष देण्याची नागरिकांची अपेक्षा आहे व विद्यार्थयाच्या सुरक्षेकरिता स्थानिक नागरिक व वाहनचालक गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत, मात्र त्याची कुठेही दखल घेतली जात नाही.

तारसा चौकाला ट्रैफिक पोलिसाची गरज 

कन्हान येथील तारसा चौक अत्यंत वर्दळीचा चौक आहे विशेष म्हणजे येथून परिसरातील समस्त शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी ये – जा करत असून या चौकाला ट्रैफिक पोलिसाची गरज आहे जेने करून अपघाताच्या शक्यतेवर आळा घालता येईल.

प्रभारी मुख्याधिकारी संदीप बोरकर, न.पं.कन्हान पिपरी 

” नगर परिषद कन्हान पिपरी येथे जागेचे अभाव असल्यामुळे कन्हान शहरांतील विकासासाठी व बाजारपेठे करिता व पार्किंग व्यवस्था याकरीता कुठलेही उपाययोजना करण्यात आले नाही,”

नितीन मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता

निवारण स्थानिक प्रशासनाने केली पाहिजे किंतु नगर प्रशासन व्यवस्था करत नसून अपघात झाल्यास पोलीस प्रशासनाला जबाबदार धरल्या जाते . पोलीस प्रशासनाने स्वतः पुढाकार घेवून नप प्रशासना सोबत चर्चा केली पाहिजे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर परिमंडलातील विजेत्या खेळाडूंचा सत्कार

Sat Feb 17 , 2024
नागपूर :-  छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर परिमंडलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून मौलिक कामगिरी केली, त्यांचा नागप[ऊर परिमंडल कार्यालयात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत सुवर्ण पदक विजेते निलेश बनकर (बुद्धीबळ एकेरी), पुष्पलता हेडाऊ (कॅरम), रितिका नायडू (बॅडमिंटन एकेरी), मनीषा चोकसे (टेनिकॉइट एकेरी) आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com