कामठी शहरातील पार्किंग व नो पार्किंग झोन चा प्रश्न केव्हा मार्गी लागणार?

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या कामठी शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीला आळा बसत लोकवस्तीतील जडवाहतुक बंदी व्हावी व नागरिकांना सोयीचे व्हावे या मुख्य उद्देशाने तत्कालीन पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या थेट निदर्शनातुन तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अधिसूचनेनुसार शहरातील 7 मार्गावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते रात्री साडे सात वाजेदरम्यान जडवाहतुकीस प्रतिबंध शिवाय कामठी शहरातील 8 स्थळी पार्किंग व 3 स्थळी नो पार्किंग झोन निर्माण करण्याच्या आदेशितावरून नगर परिषद च्या वतीने पार्किंग , नो पार्किंग चे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत तसेच जडवाहतुकीस प्रतिबंध असलेल्या ठिकाणी तशी सोय सुद्धा करण्यात आली आहे मात्र यासंदर्भात स्थानिक पोलीस विभागाच्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात अस्ताव्यस्त वाहतुकीला बळ मिळत असल्याने नागरिकांना नाहक डोकेदुखीचा त्रास भोगावा लागत आहे परिणामी शहरातील पार्किंग व नो पार्किंग ची व्यवस्था अजूनही वाऱ्यावर आहे परिणामी शहरातील वाहतूक खोळंबल्याचा व पार्किंग चा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने चक्क अतिक्रमण धारक वसलेले असल्याने याचा नाहक त्रास आता नागरीकाना भोगावा लागत आहेत त्यामुळे कामठी शहरातील निर्देशित पार्किंग व नो पार्किंग झोन चा प्रश्न केव्हा मार्गी लागणार?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

कामठी शहराचा पुढील 20 वर्षाचा विचार करीत तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्या नुसार निर्देशित केलेले पार्किंग नो पार्किंग झोन नुसार पोलीस क्वार्टर टी पॉईंट चौक ते शिवाजी पुतळा चौक , नगर परिषद जुना नाका क्र 5 ते वारीसपुरा कडे जाणारा रस्ता, जी एन रोड ते शिव पंचायत मंदिर रस्ता, शहीद स्मारक चौक ते दमडू महाराज चौक, मोटर स्टँड चौक ते भाजीमंडी पूल, कोचर बंगला ते राममंदिर मोदी शाळेकडे जाणारा रस्ता,जे एन रोड प्रबुद्धनगर चर्च ते दरोगा मस्जिद कडे जाणारा रस्ता या सात मुख्य रस्त्यावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायंकाळी साडे सात पर्यंत जडवाहतुकीस प्रतिबंध राहणार आहे तसेच 8 ठिकाणी असलेल्या पार्किंग झोन नुसार मिनी ट्रक, कार इत्यादी वाहने उभी करण्यासाठी रुईगंज मैदान येथील खरेदी -विक्री सोसायटीला लागून असलेला परिसर , मोठ्या वाहनांसाठी जुना नाका क्र 1 जवळील परिसर, तसेच खुले नाट्यगृह , बैलबाजार व त्याबाजूची जागा, ऑटो स्टँड व छोटी वाहनासाठी पासीपुरा मैदान , ऑटोस्टॅण्ड करिता जुना नाका क्र 5 जवळील मोकळी जागा , दुचाकी वाहने व कारसाठी गांधीमंच समोरील जागा तसेच राजू चाटवाले यांच्या दुकानासमोरील जागा , ट्रक व कार तसेच इत्यादी वाहनासाठी आययुडीपी एरिया जागेतील शासकीय मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे तसेच 3ठिकानावरील नो पार्किंग साठी शहीद स्मारक ते दमडू चौक , मेंनरोड मोटर स्टँड चौक ते भाजीमंडी पूल , सरदार वल्लभभाई पटेल चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत ची जागा निश्चिती करण्यात आलेली आहे.यासंदर्भात स्थानिक प्रशासनासह जनजागृती सह तशी सोय सुद्धा करण्यात आली आहे मात्र बेशिस्त वाहतूक दारांच्या वतिने नियमाला बगल देत असल्याने शहरातील पार्किंग व नो पार्किंग चा प्रश्न वाऱ्यावर असल्याचे दिसून येते ज्याकडे पोलीस विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विविध जाती धर्माचे नागरिकांनी आपली मतभेद विसरून राष्ट्रीय एकता निर्माण करावी - शीख धर्मगुरु ज्ञानीजी हर्पितसिंग

Sun May 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- विविध जाती धर्माच्या नागरिकांनी आपसी मतभेद विसरून एकत्र येऊन विविध सण -उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करून राष्ट्रीय एकता निर्माण करण्याचे आव्हान शीख धर्मगुरु ग्यानीजी हरपितसिंग यांनी मज्जिद इब्राहिम बीबी कॉलनी न्यू येरखेडा च्या वतीने आयोजित ईद -मिलन समारोहात मार्गदर्शन करताना व्यक्त केले मज्जिद इब्राहिम बीबी कॉलनी न्यू येरखेड्याच्या वतीने ईद मिलान समारोह आयोजित करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com