गादा गावातील जिल्हा क्रीडा संकुलाचे अर्धवट बांधकाम केव्हा पूर्णत्वास येणार – माजी जी प सदस्य अनिल निधान 

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी :- ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध राष्ट्रीय मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी व खेळाडूंच्या उज्वल भविष्याच्या चिंतेतून नागपूर जिल्ह्या हे तत्कालीन पालकमंत्री व नागपूर विधानपरिषदचे विद्यमान सदस्य चंद्रशेखर बवाबकुळे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची संकल्पना मनात हेरून कामठी तालुक्यातील गादा गावाजवळच्या प्रशस्त जागेवर जिल्हा क्रीडा संकुल व फुटबॉल ग्राउंड बांधकामासाठी 29 मार्च 2016 ला 26 करोड रूपयाच्या मंजूर निधीतून कामठी तालुक्यातील शहरापासून 10 की मी दूर अंतरावरील गादा गावाच्या मार्गावर 21 एकर जागेत 8 कोटी रुपयांच्या निधीतून जिल्हा क्रीडा संकुलाचे काम उभारण्यात आले असून हे काम तीन वर्षात पूर्ण करून देणे अपेक्षित होते. आजच्या स्थितीत बांधकामाला सुरू होऊन पंचवार्षिक कार्यकाळपेक्षा जास्त काळ लोटन्याच्या मार्गावर आहे मात्र काम कासवगतिने सुरू असल्याने क्रीडा संकुला अभावी तालुक्यातील खेळाडूंची उपेक्षा होत आहे तर तालुक्यातील राज्य पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंची सरावासाठी परवड होत असल्याने तालुक्यातील क्रीडा प्रेमी मध्ये घोर निराशा दिसून येत आहे. तेव्हा हे बांधकाम केव्हा पूर्णत्वास येणार असा सवाल माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी नुकतेच जिल्हा क्रीडा संकुलाच्या अर्धवट बांधकामाची पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना केला बांधकाम संदर्भात तीव्र नाराजगी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर,जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर,एसडीओ संजय पवार,तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले,क्रीड़ा संचालक पाटिल , डीएसओ पल्लवी धात्रक, सार्वजनिक बांधकाम अभियन्ता गायधने ,कामठी पंचायत समितीचे माजी सभापती उमेश रड़के, सरपंच सचिन डांगे, योगेश डाफ तसेच आर्किटेक्ट भिवगड़े आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा घेत लवकरात लवकर बांधकाम पूर्णत्वास करण्याचे संबंधितांना आदेश दिले.

कामठी शहरातील क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास येथे क्रिकेट चे नामवंत खेळाडूं सी के नायडू यांचे जन्मस्थान आहे. येथील छावणी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रब्वानी मैदानावर प्रशिक्षण पूर्ण करून विदेशात फुटबॉल मध्ये नावलौकिक मिळवनारा स्व.मुसताक पठाण यांनी सुद्धा कामठी शहराचे नावलौकिक केले तसेच काही काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत कामठीतील न्यू ग्लोबल क्लब च्या खेळाडूंनी जोरदार विजय प्राप्त केला होता या संघाचे प्रशिक्षक कोच कामठी चे श्यामलाल घोष यांच्यासारख्या महत्वपूर्ण खेळाडूंनी या शहरात राहून जीवणातील क्रीडा क्षेत्रात विजय प्राप्त केला आहे.

कामठी तालुक्यात पूर्वी कबड्डी, खो खो तसेच कुस्ती , मल्लखंबासारखे खेळ खेळले जात होते या खेळासाठी मराठा लोन्सर्स, प्रगतिमंडळ, सेव्हन स्टार क्लब, नागसेन क्लब,सुभाष मंडळ, , हरदास मंडळ आदी नावांनी मोठमोठ्या कबड्डीचे क्लब असायचे तालुक्यातील रुईगंज मैदान ,नागसेन नगर, हाकी बिल्डिंग समोर मैदान आदी ठिकाणी स्पर्धा होत होते, फुटबॉल स्पर्धा होत होत्या.मात्र आज या तालुक्यात क्रीडा संकुला अभावी खेळाडूंची निराशा होत आहे तर आज इतके वर्षे लोटून गेले मात्र क्रीडा संकुल निर्माण करून पूर्णत्व करण्यास कंत्राट दाराला अपयश येत असल्याने खेळाडूंची मात्र कुचंबणा होत असून हा प्रकार तालुक्यातील खेळाडूंच्या भविष्याशी खेळ खेळणारा ठरत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महात्मा गांधी जयंती निमित्त कत्तलखाने व मांस विक्री बंद

Fri Sep 29 , 2023
नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त २ ऑक्टोबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहेत. उपायुक्तांच्या आदेशानुसार, महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन जीइएन – १०८७/१२८६/सीआर-९३/८७/नवि/१०, दिनांक २२ एप्रिल १९८७ नुसार सोमवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com