नागपूर :-पूर्वीपासून चालत आलेला ग्रामीण मधील शंकरपट (बैलगाडी शर्यत) यावर हायकोर्टाने घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली असून आता बैलगाडी शर्यतीला कायदेशीर मान्यता दिली. त्यामुळे बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी आनंद व्यक्त केला.
बैलगाडी शर्यत किंवा शंकरपट ग्रामीण मध्ये राहणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा उत्साह, आनंद व आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघितलं जायचं.
चाळीस वर्षांपूर्वी नागपूर पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या बनवाडी या गावात तत्कालीन पोलीस पाटील नारायण तिडके यांच्या शेतात शंकरपट भरायचा. मी स्वतः शालेय जीवनात शंकरपटात नागपुरातून भावाने आणलेली संत्री विकून त्यावर्षीच्या शिक्षणाचा खर्च भागविल्या चे आठवते.
शंकरपटात ग्रामीणमध्ये जत्रेचे स्वरूप येत असते. एकेक आठवडा हे स्वरूप असते. म्हणून सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवर उठवलेली बंदी स्वागतार्ह व अभिनंदन आहे. असे मत महाराष्ट्र प्रदेश बसपा चे माजी मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले.