कन्हान येथे WCL. कामठी ओसीयम मधील बंद वर्कशॉपचे मध्यरात्री कुलूप तोडून, ICB मशीनचे पार्ट किंमती ८ लाख ६ हजार रूपयाचा मुद्देमाल, चोरणाऱ्यांना अवघ्या ६ तासाच्या आतच कन्हान पोलीसांनी केले गजाआड

कन्हान :- फिर्यादी कैलास उमराव बावणे वय २४ वर्ष (सेक्युरिटी गार्ड) कामठी हे रात्री कर्तव्यावर हजर असताना रात्री ०२.०० वा. ते ०२.३० वा. दरम्यान WCL कामठी ओसीयम बंद वर्कशॉप मधून तोडफोड करण्याचा आवाज येत होता. तेव्हा वर्कशॉप मध्ये जावून पाहीले असता गार्डला पाहून काही इसम वर्कशॉप च्या कंम्पाउंड वरून उड़ी घेवून पळू लागले. त्यांच्यावर संशय आल्याने वर्कशॉपची पाहणी केली असता, वर्कशॉपचे कुलूप तोडून आत प्रवेश करून आत मध्ये JCB मशीनचे साहीत्य पाहीले असता चोरी केल्याचे दिसून आले, वरीष्ठ अधिका-यांना माहीती देवून चोरी झालेल्या साहीत्याची पाहणी केली असता JCB मशीनचे १) एक ट्रान्समिशन फाउन्डेशन असेंम्बली अ.कि. १०,०००/- रुपये २) एक हायड्रोलिक पम्प असेम्बली अ.किंमती ५,००,००० रुपये ३) एक इंजन फाउन्डेशन ब्राकेट अ. कि. ५,००० रुपये ४) एक युजी क्रास असेम्बली अ.कि. ४०,००० रुपये ५) एक इंजन क्रेन असेम्बली अ. कि, ५०,०००/- रुपये ६) एक ट्रांसमिशन लेट अं.कि. ५,००० रुपये ७) पार्कीग ब्रेक असेंम्बली अ.कि. १,००,००० रुपये ८) एक फिटर टुल सेट अ.कि. ५,०००/- रुपये ९) एक पुराणा खराब कम्प्रेशन अ.कि. ८०,००० रुपये १०) एक व्हॅकुम पंपसेट अं. कि. ३,०००/- रू रुपये ११) एक सार्वांग किट अ. कि. ३,००० रू रुपये १२) एक फिटर टूल किट अ.कि ३,०००/- रू १३) एक फिटर मेन्टेनन्स टुल अ.कि. २,००० रू रुपये असा एकुण ८,०६०००/- रुपयाचे जे.सी.बी. चे उपयोगी साहीत्य चोरुन नेल्याचे फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा दाखल करुन सपोनी राहूल चव्हान तपास करीत आहेत.

गुन्हा नोंद होताच उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान संतोष गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी डि.वी. पथकाला सुचना दिल्या. चोरीचे गांर्भीर्य लक्षात घेवून तातडीने कन्हान पो.स्टे. चे डि.वी. पथकाने फिर्यादीस विश्वासात घेवून विचारणा केली असता चोरांनी घटनेच्या वेळी कुणाल अशी हाक दिली होती. या माहीतीच्या आधारे परीसरातील कुणाल नावाच्या इसमाचा शोध सुरू केला त्या आधारे कुणाल कश्यप यास ताब्यात घेवून तांत्रीक तपासाच्या माध्यमाने ६ तासाच्या आत या गुन्हयातील मुख्य चार आरोपी नामे १) कुणाल धर्मराज कश्यप वय २० वर्षे रा. खदान नं. ०६, व २) सुमेरसींग लालसींग चौहान वय १९ वर्षे रा. खदान नं. ०३ यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता ३) रवि उर्फ लल्ला नेमचंद राउत वय १९ वर्षे रा. खदान नं. ०३ मडीबाबा ४) समीर शिवप्रकाश कश्यप, वय १९ वर्षे रा. खदान नं. ०३, मडीबाबा यांना चपळाईने तात्काळ पकडुन विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता चारही आरोपीने गुन्हयाची कबुली दिली. बोरीचा मुद्देमाल कन्हान येथील कवाडी धंदयाचे मालक देवकुमार डेहरिया यांना माफक दरात विकल्याचे सांगितले. आरोपीच्या सांगण्याप्रमाणे देवकुमार डेहरिया यांचे ताब्यातून जप्ती पंचनाम्याप्रमाणे संपुर्ण ८,०६००० रुपयाचे मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल क्र. MH-40/CU-2418 कि. ५०,०००/- रु अशा एकुण ८,५६०००/- रूपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून हस्तगत करून आरोपींना लॉकपबंद केले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ,उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. राजेद्र पाटील, सपोनी राहूल चव्हान, पोहवा हरीश सोनभद्रे, पोना अमोल नांगरे, पोना महेश विसने, पोशि अश्विन गजभिये, पोशि आकाश शिरसाट, बापोहवा संदीप गेडाम यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पो.स्टे. रामटेक हद्दीमधील जुगार अड्डयावर धाड

Fri Aug 23 , 2024
– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई नागपूर :- दिनांक २१/०८/२०२४ रोजी पोस्टे रामटेक येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील वाहीटोली पाचगाव शिवार येथील एका झोपडीमध्ये काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे रामटेक येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com