पो.स्टे. रामटेक हद्दीमधील जुगार अड्डयावर धाड

– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई

नागपूर :- दिनांक २१/०८/२०२४ रोजी पोस्टे रामटेक येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील वाहीटोली पाचगाव शिवार येथील एका झोपडीमध्ये काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे रामटेक येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ यांनी वाहीटोली पाचगाव शिवार येथे सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे १) विकास चंदनबटवे, वय ३० वर्ष रा. विनोबा भावे वार्ड रामटेक २) संतोश चौधरी वय ५० वर्ष ३) मनोज झाडे, वय ३८ वर्ष रा. शितलवाडी ४) पंकज कांबडे वय ४३ वर्ष रा शितलवाडी ५) गजानन साठवणे, वय ४३ वर्ष रा. शितलवाडी ६) नरेंद्र कामडी वय ४२ वर्ष ७) उमेश भलावी वय २८ वर्ष रा शितलवाडी ८) आकाश यादव, वय २३ वर्ष रा. शितलवाडी हे जुगार खेळतांनी मिळुन आले. एकुण ०८ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन अंगझडतीतून नगदी रक्कम १०८००/- रू व डावावर २५५० रू तसेच तासपत्ते ५२ एकूण मुद्देमाल १३०५०/- रू चा मुददेमाल जप्त करून आरोपीतांविरूध्द पोलीस ठाणे रामटेक येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे रामटेक येथील ठाणेदार पोनि प्रशांत काळे, पोहवा गजानन माहुरे, पोना प्रफुल रंघई, पोअं. सुभाष बावनकर, शिवशंकर भोयर यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडीचा प्रयत्न करणारा आरोपी कोंढाळी पोलीसांच्या जाळयात

Fri Aug 23 , 2024
नागपूर :- दिनांक २१/०८/२०२४ चे ०२.३० वा. ते ०३.०० वा. दरम्यान मौजा बाजारगाव येथे आरोपी नामे- हर्षद किरण माणे वय २४ रा. सांगवळे ता. करवीर जि. नागपुर याने चोरी करण्याचे उद्देशाने बैंक ऑफ इंडिया बाजारगाव येथील बँकेचे जिन्या जवळील काय काढुन बँकेचे समोरील दरवाज्याचे कुलुप तोडुन आतमध्ये चोरी करण्याचे उद्देशाने प्रवेश केला. अशा फिर्यादी नामे सौ. जया अभिषेक ठवरे, वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com