दरोडयाचे गुन्हयातील पाहिजे आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. ४४, अलिशान नगर, जिजामाता नगर, वाठोडा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी आरीफ इनायतखान पठान, वय २८ वर्षे, हे गुन्ह्यामध्ये मध्यवर्ती कारागृह येथे दाखल असतांना तेथे त्यांची ओळखी झालेले आरोपी क. १) कुणाल सुरेश हेमने, वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १९४, आझाद नगर, विडगांव, २) विशाल उर्फ फल्लो पृथ्वीलाल गुप्ता, वय २२ वर्षे, रा. प्लॉट नं. १४९, श्रवण नगर, वाठोडा ३) सुजीत भाऊराव धरडे, वय २३ वर्षे, रा. रामनगरी, वाठोडा, ४) कुलदिपसिंग लखनसिंग बावरी, वय २९ वर्षे, रा. वार्ड नं. २, खौरी पोलीस चौकीमागे, बु‌ट्टीबोरी, नागपूर पाहीजे आरोपो ५) अफसर उर्फ अंडा, वय ४५ वर्षे, रा. गि‌ट्टीखदान यांनी फिर्यादीचे घराजवळील जिजामाता नगर, चारडिपी जवळ येवुन फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन ‘तुला ऋणी खोसला याच्या मर्डरच्या सुपारीने पैसे भेटले आहे, त्यामधील दहा हजार रूपये आम्हाला दे” असे म्हणून, १०,०००/- रू. जबरीने हिसकावून घेतले. तसेच, फिर्यादीचे पत्नी व वडीलांना शिवीगाळ करून धमकी दिली. फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे आरोपीविरूध्द कलम ३१०(२), ३५२, ३५१(२) भा.न्या.सं., अन्वये गुन्हा नोंदविला होता. वाठोडा पोलीसांनी गुन्‌ह्याचे तपासात आरोपी क. १ ते ४ यांना ताब्यात घेतले होते. आरोपींचे ताब्यातुन ह्युंदाई कंपनीची कार, ०२ पिस्टल, ०१ रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुस व ०२ लोखंडी चाकु असा एकुण किंमती अंदाजे २,५०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे शेख अफसर उर्फ अंडा शेख युसूफ, वय ५२ वर्षे, रा. आयबीएम रोड, मोठ्या मस्जिद जवळ, गि‌ट्टीखदान, नागपूर हा गुन्हा केल्यापासुन मिळुन येत नव्हता. गुन्हेशाखा युनिट क्र. २ से अधिकारी व अंमलदार है आरोपीचे शोधात असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की,नमुद आरोपी हा कन्हान नदी पुलाजवळ, कामठी रोड, साई मंदीरा मागे, असलेल्या जंगलातील दर्गाह मध्ये स्वतःचे अस्तीत्व लपवुन राहत आहे. अशा माहितीवरून पोलीसांनी दर्गाह परिसरात सापळा रचुन घेराव टाकला असता, आरोपी हा जंगलात पळून जाण्याचे येतात असतांना त्याचा पाठलाग करून त्यांस ताब्यात घेतले. आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर,  संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर,  राहुल माकणीकर पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शानाखाली मपोनि. शुभांगी देशमुख, सपोनि, गजानन चांभारे, महेन्द्र सडमाके, संदीप चंगोले, दिपक चोले, शैलेय जांभुळकर, राजेश तिवारी, नापोअं. कमलेश गहलोत, पोअं. संदीप पांड व सुनिल कुंवर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस

Mon Oct 21 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीत देवगडे आटा चक्की जवळ, तिवारी तेलीपूरा, पेवठा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी विनोद भाऊराव वराडे वय ५१ वर्ष यांनी त्यांची हिरो होन्डा स्लेंडर गाडी क. एम.एच ३१ डी.एन २०९२ ही लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शांतीनगर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com