नागपूर:- फिर्यादी सवीता ब्रीजलाल यादव वय ६० वर्ष हया त्यांचा मुलगा नामे निकेश उर्फ साई ब्रीजलाल यादव वय ४० वर्ष दोन्ही रा. इंदोरा, आनंद रोड, हनुमान मंदीर जवळ, जरीपटका, नागपूर याचेसह घराबाहेर वाकडयावर बोलत बसले असता त्यांचे घरासमोर एका दुचाकी मोटरसायकलने तिन ईसम आले, मोटरसायकल चालू ठेवुन दोन ईसम गाडीवर बसलेले होते. पैकी मागे बसलेला हा खाली उतरला तो पायदळ फिर्यादी जवळ आला व त्याने त्याचे एका हातातील मिर्ची पावडर फियादीचे मुलाने डोळयावर फेकली व दुसऱ्या हाताने चाकु काढुन निकेशच्या पोटावर, छातीवर कमरेवर, पाठीमागे व हाता-पायावर वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी हया मुलाला वाचविण्याकरीता मध्ये गेल्या असता आरोपीने त्यांचेही डाव्या हातावर वार करून जखमी केले, वस्तीतील लोक जमा झाल्याने आरोपी हा सुरू असलेल्या मोटरसायकलवर बसुन तिघेही पळुन गेले. निकेशने चाकु मारणारा आरोपी हा राकेश भांजा नावाचा वय ४० ते ४५ वर्ष असल्याचे सांगीतले, इतर दोन्ही आरोपी २५ ते ३० वयोगटाचे होते. जखमी फिर्यादी व निकेशला उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान निकेश उर्फ साई ब्रीजलाल यादव वय ४० वर्ष याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे आरोपीविरूध्द कलम ३०७, ३०२, ३२४, ३४ भा.द.वि. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सदर गुन्हयात पाहिजे असलेला मुख्य आरोपी राजेश उर्फ भांजा रमेश वानखेडे वय ४९ वर्ष रा. पिवळी नदी, धम्मानंद नगर, पोलीस ठाणे यशोधरानगर, नागपूर ह.मु. रिब्लीकन नगर, इंदोरा नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस पुढील कारवाई कामी जरीपटका पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. वरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त डिटेक्शन), मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.