नागपूर :- पोलीस ठाणे सदर हद्दीत गट शिक्षण अधिकारी गट साधन केंद्र प.स. नागपुर जि. परिषद कन्या हायस्कूल सदर येथे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम सन २००९ नुसार, सन २०२३-२४ या शैक्षणीक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया राबविण्यात आली होती, निवड झालेल्या पाल्यांचे पालकांनी गटसाधन केंद्र येथे आवश्यक कागदपत्रे सादर केली होती, कागदपत्राचे पडताळणी दरम्यान आरोपी यांनी उत्पन्नाचे बनावट दाखले तसेच बनावट रहीवासी पुरावे सादर करून प्रवेश मिळविला, असा गटशिक्षण अधिकारी प.स. नागपुर फिर्यादी कवडु रामेश्वरराव दुर्गे वय ५७ वर्षे यांनी दिलेल्या तकारी वरून पोलीस ठाणे सदर येथे आरोपीविरूद्ध कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपी १) प्रशांत गजानन हेडाऊ वय ३५ वर्ष रा. अयोध्या नगर, महात्मा गांधी चौक, नागपूर २) राजेश शिवपाल बुवाडे वय ३९ वर्ष रा. कस्तुरी गार्डन गोटाळ पांजरी, नागपूर ३) राना जमशीद शरीफ वय ३३ वर्ष रा. प्लॉट नं. ३८, अनंतनगर बस स्टॉप जवळ, गिट्टीखदान, नागपूर यांना अटक करण्यात आलेली होती.
तपासादरम्यान गुन्हयातील अटक आरोपी राजा जमशीद शरीफ वय ३३ वर्ग याचेकडुन तो वापरत असलेला अॅपल कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला, नमुद मोबाईल मध्ये गुन्हयाचे काही पुरावे मिळण्याचे अनुषंगाने मोबाईलची पंचासमक्ष पाहणी केली असता मोबाईल मध्ये वन्यप्राणी बारासिंगा, हरीण, निलगाय या प्राण्यांचे शिकार केल्याचे फोटो व व्हीडीयो क्लीप दिसुन आल्या, तसेच मोबाईल मध्ये ५० वर्ष जुने सागवन झाडांची कटाई केल्याचे फोटो व व्हिडीयो सुध्दा आहणुन आले. नमुद शिकार आरोपी राजा शरीफ व त्याचे मित्रांनी बरघाट/शिवनी मध्य प्रदेश येथे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून मध्य प्रदेश येथील फॉरेस्ट विभागाशी संपर्क साधण्यात आला. दिनांक २७.०७.२०२४ रोजी स्टेट टायगर स्ट्राईक फोर्स युनिट जबलपूर, हेड ऑफीस भोपाल, मध्य प्रदेशचे ए.सी.एफ व आर.ओ हे त्यांचे टिमसह नागपूरला आल्याने नमुद पुरावे पुढील कारवाईस्तव त्यांचे ताब्यात देण्यात आले. आरोपी राजा शरीफ याचे मोवाईल मध्ये एका अल्पवयीन मुलीबाबत आक्षेपार्ह बदनामीकारक चॅटींग केल्याचे आढळल्याने योग्य कारवाई करून पुढील तपासकामी पोलीस ठाणे शिवनी, मध्य प्रदेश येथे कागदपत्रे पाठविण्यात आलेली आहे.
वरील कामगिरी मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), पोलीस उपायुक्त (परिमंडळ कं. ०२), सहायक पोलीस आयुक्त (सदर विभाग), यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि, मनिष ठाकरे, पोहवा. रविन्द्र, अमोल, नापोअं. प्रमोद संजय यांनी केली.