नागपूर महानगरपालिकेची समाजकंटकांच्या मदतीने नागपूरकरांची लूट…

नागपूर :- नागपूर स्मार्ट सिटी व महानगरपालिकेचे अधिकारी स्मार्ट पार्किंगच्या नावाखाली हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांना हाताशी धरून अनधिकृत पणे स्मार्ट पार्किंग च्या नावाखाली अवैध वसुली करत असल्याचे मनसेच्या निदर्शनास आले असता मनसे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे व पदाधिकारी वर्गाने विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरं देऊन बोळवण करण्यात आली. तथापि अनधिकृत वसुलीच्या या विषयावर खोलवर चौकशीची गरज असल्याचे निदर्शनास येत आहे तरी या निवेदनाद्वारे मनसे मागणी करते की सत्ताधारी पक्षाच्या व महानगरपालिकेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी या विषयाची योग्य ती चौकशी करून नागपूरकरांची या अवैध व अनधिकृत आर्थिक लुटी पासून सुटका करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आंदोलन करण्याचा इशारा तुषार गिऱ्हे यांनी दिला. त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित विभाग अध्यक्ष चेतन बोरकुटे विभाग उपाध्यक्ष हर्षद दसरे रोशन इंगळे, शाखाध्यक्ष अजिंक्य मिश्रा, प्रशांत साखरे व इतर उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

व्हाईस ऑफ मीडियाच्या विंगच्या सुभेदारांनी मांडल्या भूमिका....

Sat Nov 18 , 2023
“हम बदल जाये तो हालत बदल सकते है”…. पहिले सत्र : व्हाईस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन बारामती :- पत्रकारांच्या न्याय्य हक्काचे व्यासपीठ असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचे राज्याचे अधिवेशन आजपासून बारामती येथे सकाळी सुरूवात झाली. पहिल्या सत्रामध्ये व्हाईस ऑफ मीडियाची कामगिरी आगामी काळातील भूमिका, कार्य व जबाबदारी यावर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी थंडीचे दिवस असतानाही राज्यभरातून आलेल्या पत्रकारांची पावले गदिमा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com