नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ ने अधिकारी व अंमलदार यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, मध्य प्रदेश येथील जबरी चोरी व ईतर एकूण १४ गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी नामे सालिग उर्फ रेहान ईरानी पुत्र शौकत वय २७ वर्ष रा. अमन कॉलोनी, ईरानी डेरा, जि. भोपाल, मध्य प्रदेश याचेवर मध्य प्रदेश सरकार कडुन ५०,०००/- रू. बक्षीस जाहिर असुन, तो आरोपी हंसा दृव्हल्स ने भोपाल येथुन हैदराबाद कडे जात आहे, अशा माहितीवरून त्यांनी दिनांक १०.०१.२०२४ ने ०३.०० वा. हंसा ट्रव्हल्सला पोलीस ठाणे कोराडी हद्दीत थांबवुन सापळा कारवाई करून नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्यास युनिट क. ५ येथे आणुन चौकशी केली असता, त्याने मध्य प्रदेश येथील पोलीस ठाणे गांधीनगर, हबीबगंज, शाहपूरा, अयोध्यानगर-२, पिपलानी-२, कोहेफिजा, वैरागड, कमलानगर, हनुमानगंज, गोविंदपुरा येथे जबरी चोरीचे गुन्हे तसेच पोलीस ठाणे निशदपूरा येथे गैरकायदयाची मंडळी जमवुन शासकीय कामात अडथळा, कोतवाली नगर येथे कलम ३०४ भा.या.सं. अन्वये असे एकुण १४ गुन्हे केल्याचे सांगीतले. आरोपीस पोनि, प्रमोदकुमार वर्मा स्पेशल टास्कफोर्स लखनऊ उत्तर प्रदेश यांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. राहुल शिरे, पोहवा. चंद्रशेखर गौतम, रूपेश नानवटकर, राजुसिंग राठोड, नापोअं, अनिस खान, प्रविण भगत, पोअं. सुनिल यादव, देवचंद धोटे, रोशन तांदुळकर, सुधिर तिवारी व सायबर युनिट यांनी केली.