नागपूर :- दिनांक १०.०१.२०२५ रोजी मा. अति. सह जिल्हा न्यायाधिश व अति. सत्र न्यायाधिश (विशेष पोक्सो कोर्ट), नागपुर श्री. आर.पी पांडे, यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. ३७७/२०२२ मधील, पोलीस ठाणे अरीपटका येथील अप, क. ३६२/२०२२ कलम ३७६ (अ) (ब), ३७६ (२) (एन), ३७६ (२) (एल), ५०६ भा.द.वि., सहकलम ४, ६ पोक्सो या पुन्हयातील आरोपी नामे मनिष सुरेश लीबांडे वय २४ वर्ष, रा. जरीपटका, नागपुर याचे विरूध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा शावीत झाल्याने, आरोपीला कलम ३७६ (३) भा.दं.वि. अन्वये २० वर्ष कठोर कारावासाची शिक्षा व १५,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०६ महिने कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली.
दिनांक २४.०४.२०२२ ने ०१.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन फिर्यादी हिला वर नमूद आरोपी याने मोबाईल फोन द्वारे घरी बोलावुन ओळखीचा फायदा घेवुन तिचे सोबत जबरीने शारिरीक संभोग केला, व याबाबत कोणाला काहीही सांगीतल्यास फिर्यादी व तिच्या घरच्या लोकांना मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीचे तकारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपीस दिनांक ०६.०६,२०२२ रोजी अटक करण्यात आली होती.
गुन्हयाचे तपासी अधिकारी मपोउपनि विद्या काळे यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अँड. आसावरी परसोडकर यांनी तर, आरोपीतर्फे अँड. आर.एच रावलानी यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्यात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा. योगेश, पोअं. किशोर यांनी काम पाहिले.