ट्रक व कापुस जळुन राखरांगोळी होऊन १ कोटी ५ लाख रूपयाचे नुकसान.
कन्हान : – नरखेड वरून कापुस भरून कलकत्ता ला जाणा-या चालत्या ट्रक मधिल कापसा शाटशर्किट मुळे आग लागल्याने ट्रक थांबवुन ट्रक चालक कुदल्या ने सुखरूप बचावला तर कापुस जळुन अतोनात नुकसान झाले.
मंगळवार (दि.१) मार्च ला नरखेड वरून ट्रक क्र डब्लु बी २३ एफ ०५१३ मध्ये ३० टन कापुस भरून कलकत्याला जाताना पारशिवनी आमडी फाटा रोड वरील नयाकुंड जवळ शार्टशर्किटने चालत्या ट्रक मधिल कापसा ला अचानक आग लागल्याचे ट्रक चालकास लक्षात येताच ट्रक थांबवुन खाली कुदल्या ने ट्रक चालक सुखरूप बचावला. नयाकुंड पोलीस पाटील यानी पारशिवनी पोलीसाना घटनेची माहीती दिल्याने पोलीस निरिक्षक आपल्या सहकर्मचा-यासह घटनास्थळी पोहचुन नगरपरिषद खापा येथील अग्नि शामक बंब गाडी बोलावुन आग विझविण्याचा पर्यंत केला. परंतु सकाळी ९ वाजे पर्यंत कापुस व ट्रक जळुन राख रांगोळी झाल्याने चौदा चाकी ट्रक किंमत ७५ लाख रूपये व ३० टन कापुस ३० लाख रूपये अशा एकुण १ कोटी ५ लाख रूपयाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.