टेकाडी येथे पी डब्लु एस काॅलेज द्वारे सात दिवसीय शिबीर थाटात संपन्न

पुन्हा शिबीर पुढल्या वर्षी सुद्धा टेकाडी गावात घेऊन या – सरपंच सुनिता मेश्राम
 
कन्हान : – टेकाडी येथे पी डब्लु एस काॅलेज नागपुर द्वारे शिबीरांचे आयोजन करण्यात आले असुन काॅलेज च्या विद्यार्थी, विद्यार्थींनी व शिक्षकांनी नागरिकांना विविध जिवनावश्यक विषयी माहिती देऊन विविध कार्यक्रमाने शिबीर थाटात संपन्न करण्यात आले.
        सात दिवस टेकाडी येथे पी.डब्ल्यु.एस कॉलेज चे प्राचार्य डॉ.पाटील सर, विद्यापीठातील डॉ.कोरेटी सर, डॉ.गान , डॉ.सुशांत , डॉ.तागडे आणि विद्यार्थी, विद्यार्थीनीं द्वारे टेकाडी गावात शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सात दिवस सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनीं अतिशय चांगले कार्यक्रम प्रस्तुत करून गावात जनजागृती रॅली काढुन स्वच्छते चा संदेश दिला व आरोग्य आणि रोगराई या बाबतीत सुद्धा महत्वाची माहीत गावातील नागरिकांना दिली. या बद्दल टेकाडी ग्राम पंचायत सरपंचा सुनिता मेश्राम यांनी म्हटले की, पुन्हा असेच शिबीर पुढल्या वर्षी सुद्धा टेकाडी गावात घेऊन या. अशा शिबिरातुन सर्वां च्या बुद्धीचा विकास होतो. विद्यार्थांना चांगल्या सवयी लागुन प्रात्याक्षिकातुन सेवाभावी कार्य करण्याची आवड निर्माण होते. टेकाडी येथे पी.डब्ल्यु.एस कॉले ज द्वारे शिबीरांचे आयोजन केल्याबद्दल ग्राम पंचायत सरपंचा सुनिता मेश्राम व सदस्यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थांचे आभार व्यक्त केले.
       सात दिवसीय शिबीर कार्यक्रम यशस्वी करण्यात करिता टेकाडी ग्राम पंचायत सचिव आतिश देशभ्रतार , सरपंचा सुनीता मेश्राम, सदस्य सिंधु सातपैसे, मिना झोड, सुरेखा कांबळे, माया मनगटे, दुर्गा राजपूत, अरू ण सुर्यवंशी, विनोद चिमोटे आदी सह ग्राम पंचायत अधिकारी, कर्मचारी व गावतील नागरिकांनी बहु संख्ये ने उपस्थित राहुन सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागरिकांच्या पाणी प्रश्नाकरता माजी नगरसेविका डॉ.परिणीता फुके धडकल्या आयुक्त कार्यालयावर

Wed Apr 13 , 2022
नागपुर : – प्रभाग क्रमांक १३ मधील कमलानगर, काचीमेट, संजयनगर, पांढराबोडी, अंबाझरी ई. पश्चिम नागपुरातील वस्त्यांमधे ऊन्हाळ्याच्या सुरवातीलाच कमी पाण्याचे प्रेशर असल्याने नागरीक फार परेशान आहेत. नागपुरच्या कडाक्याच्या ऊन्हाळ्यात सगळ्यांनाच पाणी लागते व प्रेशर नसल्यास कामकरी नागरिकांचा महत्वाचा कामाचा वेळ पाणी भरण्यातच जातो व त्यामुळे येथील नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या प्रभागाच्या कर्तव्यात दक्ष माजी नगरसेविका डाॅ.परीणीता फुके […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com