बायोडिझेल रसायन सह  एकुण 44,13,000 रूपयाचा मुद्दे माल जप्त..

 नागपुर –  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त करीत असतांना पोलीस स्टेशन मौदा हद्दीतील मौजा कडोली संपत धाबा येथे एमएच-04/एफयु-7066 क्रंमाकाच्या टँकर ट्रकची पाहणी केली असता टॅन्कर मध्ये बायोडिझेल सारखे रसायन भरलेले मिळून आले. त्यामुळे पुरवठा निरीक्षक कामठी यांच्यासह सदर टँकर ताब्यात घेऊन टॅन्कर मध्ये असलेल्या रसायनाची तपासणी केली असता टॅन्कर मध्ये अंदाजे 28,400 लिटर बायोडिझल प्रती लि.कि. 85/-रू. प्रमाणे कि. 24,13,000/-रू. व 12 चक्का ट्रक एमएच-04/एफयु-7066 कि. 20,000,00/- रू. असा एकुण कि. 44,13,000/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करून पुढील कार्यवाही करिता कागदपत्र व मुद्देमाल पोस्टे मौदा यांचे ताब्यात दिले.
सदर प्रकरणी सरकार तर्फे पंकज पंचभाई (पुरवठा निरीक्षक तह.कार्या.कामठी) यांचे रिपोर्टवरुन पोलीस ठाणे मौदा येथे अप.क्र. 604/2022 कलम 285 भादवी सहकलम 3,7 अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 अन्वये गुन्हा नोंदवुन जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे मौदा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीतांचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे मौदा येथील पोनि खराबे  करीत आहे.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक  राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस निरीक्षक  चंद्रकांत काळे, पोउपनी  भरत थिटे, पोहवा  मदन आसतकर,  विनोद काळे,  नरेंद्र पटले, पोना बालाजी साखरे, रोहन डाखोडे,  प्रणय बनाफर, अजिज शेख,  चापोशी आशितोष लांजेवार यांचे पथकाने केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com