पारशिवनी :- नागपुर जिल्ह्यांतील पारशिवनी तालुकाचे २२ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी बुधवार आज पासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहीती तालुका निवडणूक अधिकारी तहसिलदार प्रशांत सांगळे आज दिली . ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शुक्रवार 18 नोव्हेंबर 2022 रोजी पारशिवनी चे तहसीलदार प्रशांत सागळे निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. पारशिवनी तालुका चे २२ ग्राम पंचायती चे मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मत मोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी तहसिल कार्यालयात होईल.
पारशिवनी तालुकात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीं मध्ये (१) साटक,(२) मेहंदी,(३) सालई( मो),(४) तामसवाडी ,(५) जुनी कामठी,(६) सालई(मा),(७) दहेगाव जोशी,(८) बोरडा ( गणेशी),(९) गोडेंगाव (१०) नांदगांव , (११) नयाकुंड,(१२) पालोरा,(१३) खंडाळा( म),(१४) खंडाळा( डुमरी),(१५) डुमरी कला,(१६) कांद्री,(१७) पारडी,(१८) निलज,(१९) टेकाडी( को ख),(२०) वाघोडा,(२१) करंभाड़, आणी(२२) बखारी गावात थेट सरपंच सह ग्राम पंचायत सदस्या चे निवडणुक होणार असल्याची माहीती पारशिवनी तालुका चे निवडणुक अधिकारी यांनी