मतदार यादी अचूक होण्यास मतदारांनी सहकार्य करावे, जिल्हाधिकारी डॅा. विपिन इटनकर यांचे आवाहन

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

उद्या जिल्ह्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन

नागपूर :- मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. पाच जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी, उद्या (10 नोव्हेंबर रोजी) नागपूर जिल्ह्यातील 569 ग्रामपंचातींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभेमध्ये प्रारूप मतदार यादीचे वाचन केले जाणार आहे. मतदारांनी दावे व हरकती दाखल करीत मतदार यादी अचूक होण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपिन इटनकर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मीनल कळसकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नऊ नोव्हेंबर ते आठ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती 26 डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. 3 जानेवारी 2023 पर्यंत अंतिम प्रसिद्धीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी मागण्यात येणार आहे. डाटाबेस अद्ययावत करणे तसेच पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. अंतिम यादी पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आज राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादी देण्यात आली. प्रारूप यादी तपासून घ्यावी. काही आक्षेप असतील त्यानुसार फॅार्म 7 व 8 सादर करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना यावेळी केले.

दरम्यान, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी करीता 7 नोव्हेंबरपर्यंत 11 हजार 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. या निवडणुकीसाठी 43 मतदार केंद्र असणार आहेत.प्रारूप मतदार यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती 23 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीने घेतला शहरातील स्थितीचा आढावा

Thu Nov 10 , 2022
नागपूर :- स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) शुक्रवारी (ता.२१) नागपूर शहरातील स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची (Death Audit Committee) बैठक पार पडली. बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सदस्य इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) चे सहा.प्राध्यापक डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com