स्नेलन चार्टद्वारे जिल्हयातील शालेय मुलांची दृष्टीदोष तपासणी

नागपूर :- मुलांच्या दृष्टीदोषाचे लवकर निदान व त्यावरील योग्य उपचार झाल्यास त्यांचा दृष्टीदोष दुर होण्यास मदत होऊन वेळीच आजारावर उपचार करणे सोईचे होईल व त्यामुळे त्यांचे शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शालेय मुलांची दृष्टीदोष तपासणी स्नेहल चार्टद्वारे करण्यात येणार आहे. सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत स्नेलनचार्टची व्यवस्था करावी,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.

जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्याची वैद्यकिय तपासणी RBSKTeamद्वारे नियमित केली जाते, यात सर्व मुलांची डोळयाची तपासणीचा सुध्दा समावेश आहे. परंतू RBSKteam द्वारे वर्षातून 1 ते 2 वेळा तपासणी करण्यात येते. तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष आढळून येतात. त्यामुळे मुलांची शाळेतच प्राथमिक स्वरुपाची तपासणी होणे गरजेचे आहे.

यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक शाळेमध्ये एक नोडल शिक्षकाची नेमणूक करुन संबंधित शाळेतील शिक्षकाने स्नेलन चार्ट (Snellen Chart) द्वारे विद्यार्थ्यांची वेळोवेळी डोळ्याची चाचणी करुन घेतल्यास दृष्टीदोष आहे किंवा नाही, याबाबत प्राथमिक माहिती मिळू शकेल. त्याप्रमाणे हे तिन्ही चार्ट हे एका उजेड असलेल्या रुम मध्ये लावून ६ फुट अंतराने त्याचे वाचन करुन त्यांच्या नोंदी ठेवण्यात याव्यात, याबाबतचा अहवाल संबंधित RBSK Team ला कळविण्यात यावा. स्नेलन चार्ट (Snellen Chart) चाचणी वापरा बाबतचा Video तज्ञांद्वारे तयार करण्यात आलेला असुन तो अवलोकनार्थ ZP Website वर Upload करण्यात आलेला आहे.

याबाबत प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांमध्ये स्नेलन चार्ट लावण्यात आलेले आहेत व तपासणीची सुरुवात झाली असल्याबाबतची शहानिशा करावी व शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना कळवावे, अशा सूचना शर्मा यानी दिल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग योजनेंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

Sat Apr 8 , 2023
नागपूर :- ‘प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’योजनेंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योजकांसाठी सुवर्णसंधी असून या योजनेसाठी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी केले आहे. केंद्र शासन पुरुस्कृत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना सन 2020-21 पासुन ते सन 2024-25 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक मालकी/भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, अशासकीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com