हाॅटेल समोरून बुलेट दुचाकी वाहन चोरी
कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस सात कि मी अंतरावर असलेल्या खंडाळा शिवारातील नागपुर बॉय पास राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल समोर उभी ठेवले ली बुलेट दुचाकी वाहन अज्ञात आरोपीने चोरी केल्या ने कन्हान पोस्टे ला फिर्यादीने तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.
           प्राप्त माहिती नुसार जयंत दिवाकर कुंभलकर राह. लोहीया ले-आऊट कन्हान हा हाॅटेल युनीक ईन चा मालक असुन त्याने आपले बुलेट दुचाकी वाहन बुधवार (दि.२३) फेब्रुवारी ला रात्री ९ वाजता खंडाळा शिवारातील नागपुर बॉयपास राष्ट्रीय महामार्गावरील त्यांचे हाॅटेल समोर लाॅक करून ठेवलेली खाकी रगांची बुलेट दुचाकी वाहन ३५० सीसी, क्र. एम एच ४० बी एक्स ६१००, चेसीस क्र. me3u355c2kh695723 व इंजीन नं. u3s5c2kh619497 किंमत ७०,००० रुपये. दुसऱ्या दिवशी गुरुवार (दि.२४) फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता हाॅटेल मधिल काम आटपुन बाहेर येवुन दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही. तिचा आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन न आ ल्याने अज्ञात आरोपीने चोरी केल्याने कन्हान पोलीस स्टेशनला फिर्यादी जयंत कुंभलकर यांच्या तोंडी तक्रा रीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पो लीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.
Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com