यवतमाळ :- गोंड गोवारी समाजाच्या निवेदनांवर अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश के.एल.वडणे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी विकास विभागाच्यावतीने समिती नेमण्यात आलेली आहे. समितीच्यावतीने नागपूर व अमरावती येथे निवेदने स्विकारुन म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे.
गोंड गोवारी समाजाच्या संबंधित संघटनेचे नागपूर महसूल विभागाचे प्रतिनिधी दि.15 व दि.16 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 वाजताच्या दरम्यान रविभवन, शासकिय विश्रामगृह, नागपूर येथे व अमरावती महसूल विभागाचे प्रतिनिधी दि.18 ते दि.20 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत शासकीय विश्रामगृह अमरावती येथे उपस्थित राहून समितीसमोर आपले संक्षिप्त लेखी निवेदन सादर करु शकतील.
निवेदन टंकलिखीत व वाचनीय असणे आवश्यक आहे. तसेच संघटनेतील प्रतिनिधीला थोडक्यात आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्यात येईल, असे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.