इस्कॉनतर्फे विश्व हरिनाम सप्ताह थाटामाटात साजरा

– आय.जी.एफ. (इस्कॉन गर्ल्स फोरम) तर्फे वैष्णवी पदयात्रा

नागपूर :- आंतरराष्‍ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), नागपूर केंद्रातर्फे श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर, गेट क्रमांक २, एम्प्रेस मॉलच्या मागे विश्‍व हरिनाम सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले. इस्कॉनचे संस्थापकाचार्य ए. सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे प्रिय शिष्य श्रील लोकनाथ स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने, इस्कॉनचे अध्यक्ष सच्चिदानंद प्रभू आणि उपाध्यक्ष व्रजेंद्र तनय प्रभू यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमांतर्गत इस्कॉन गर्ल्स फोरम (आयजीएफ) तर्फे आदिशक्ती माताजींच्या नेतृत्वात “एक दिवसीय वैष्णवी पदयात्रा” आयोजित करण्यात आली. त्‍यात दोनशेहून अधिक युवती व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वप्रथम मनुप्रिया माताजींनी गौर निताईची आरती केली. यावेळी प्रणय किशोरी माताजींनी हरे कृष्ण महामंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे। राम हरे राम राम राम हरे हरे।। हा मंत्राचा कीर्तन केला. त्यानंतर शुभांगी माताजींच्या उत्साहवर्धक आशीर्वादाने पदयात्रेला सुरुवात झाली.

इस्कॉन नागपूरचे प्रवक्ते डॉ.श्यामसुंदर शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, ही पदयात्रा इस्कॉन मंदिरापासून सुरू झाली आणि फुले मार्केट, लोहापूल, शनी मंदिर रोड, महाराष्ट्र बँक चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, ग्लोकल मॉल, महाराष्ट्र बँक चौक, कॉटन मार्केट चौकातून मार्गक्रमण करून पुन्हा इस्कॉन मंदिर येथे पदयात्रेचे समापन झाले. पदयात्रेच्या वाटेवर जोशी परिवाराने सर्वांना लिंबू सरबताचे वाटप केले व वनमाळी गोविंद प्रभुजी यांनी पाणी व फराळाची व्यवस्था केली.

पदयात्रेच्‍या मार्गावर आयजीएफच्या मुलींनी हरे कृष्ण महामंत्राचा सुमधुर जप केला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी इस्कॉनच्‍या ज्येष्ठ भक्त एच.जी. शुभांगी माताजींनी सांगितले की, हा हरिनाम सप्ताह जगभरात साजरा केला जातो. यापूर्वी केवळ एकच दिवस विश्व हरिनाम दिन म्हणून साजरा केला जात होता. याची सुरुवात प्रभुपाद शताब्दीच्या वेळी लोकनाथ स्वामी महाराजांनी केली होती. याच दिवशी प्रभुपादांनी अमेरिकेच्या भूमीवर प्रथम पाऊल ठेवले होते. याशिवाय, ‘कलियुगातील हरिनामाचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन देताना माताजींनी कलियुगातील भक्ती आणि साधनेसाठी हरिनाम हे कसे सोपे आणि प्रभावी माध्यम आहे, आणि लोकांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती देते, हे सांगितले. त्यांच्या प्रभावी प्रवचनानंतर सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.

दामोदर प्रिया माता, मनु प्रिया माता, कृष्णकांता माता , जपारुची माता , जानकी प्रियसी माता , मंजिरी माता, लीलामयी राधा माता यांचे या पदयात्रेतील विग्रह सेवेत महत्त्वाचे योगदान राहिले. कीर्तन सेवेत सुनंदा माता , प्रणय किशोरी माता , उन्नती, मृण्मयी, श्रुती पांडे, मयुरी, धनश्री, श्रुती, तान्वी, जान्‍वी, वैष्णवी यांचा सहभाग होता. वृंदा प्रिया माता जी, केशवतोशिनी माता, भक्तिनिधी माता , प्रिया, आसावरी, ऋषिका यांनी नृत्य सादर केले. गौरांगीशक्ती माताजी, गायत्री, तन्वी, पल्लवी आणि खुशी यांनी पुस्तक वितरणाची जबाबदारी घेतली आणि स्नेहा माताजी, प्रीती माताजी, मोहिनीश्यामा माताजी इत्यादींनी इतर अनेक सेवांमध्ये योगदान दिले. हा अप्रतिम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतर भाविकांचेही सहकार्य केले. युगलनाम निष्ठा प्रभू, पुरुषोत्तम प्रभू, एकनाथ प्रभू, नित्य कृष्ण किशोर प्रभू, किशन प्रभु, नीलेश प्रभु, मनीष चौरसिया आणि विशाल प्रभु यांनी प्रसाद सेवा आणि गर्दी नियंत्रणात मदत केली. अशा प्रकारे, इस्कॉन गर्ल्स फोरमच्या समर्पण आणि सेवाभावामुळे ही पदयात्रा भव्य आणि यशस्वी झाली. अक्षदा, पूर्वा आणि ऋषिका यांनी प्रसारमाध्यमांसाठी तर रघुपती शरण प्रभू, नारायण शर्मा, कृष्णा जैस्वाल, वेदांत जीवनापूरकर, ऋषी शर्मा यांनी कीर्तन सेवेत मदत केली.

सर्व भक्तांचे व इस्कॉन व्यवस्थापन समितीचे विशेष आभार व्यक्त करून आदिशक्ती माताजी म्हणाल्या की, या कार्यक्रमाचे यश हे सर्व सेवकांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. सर्व भाविकांच्या सहकार्याचे, निष्ठेचे आणि सेवाभावाचे त्यांनी कौतुक केले. त्‍यांच्याशिवाय या पदयात्रेचे आयोजन करणे शक्य नव्हते, असे त्‍या म्‍हणाल्‍या. याशिवाय, त्यांनी इस्कॉन व्यवस्थापन समितीचे ही विशेष आभार मानले, त्‍यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्याने हा कार्यक्रम इतक्या मोठ्या दिमाखात पार पडला.

– डॉ. श्यामसुंदर शर्मा प्रवक्ता इस्कॉन नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ मध्ये नागपूर विभागातील ७ ग्राम पंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार

Mon Sep 30 , 2024
Ø विभागीय आयुक्त बिदरी यांच्या मार्गदर्शनात अभिनव यश नागपूर :- माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यस्तरावर प्रथमच नागपूर विभागातील ग्रामपंचायतींनी कामाची मोहर उमटविली आहे. या अभियानांतर्गत विभागातील सात ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय पुरस्करासाठी निवड करण्यात आली असून १५ ग्रामपंचायतींना विभागीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव यश प्राप्त झाले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com