रामटेक – रविवारी रामटेक येथे ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य ची कार्यकारणी सभा विलास जोगदंडे साहेब (अध्यक्ष ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य) यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन दुधरामजी लो. सव्वालाखे (सदस्य जी.प. नागपुर) उपस्थित होते. या सभेत ग्राम रोजगार सेवकानी खालीलप्रमाणे मागण्या केल्या. ग्राम राजगर सेवकाचा मानधन त्यांचा बँक खात्यात जमा करावे, ग्राम रोजगार सेवकाना स्थायू मानधन मिळावे, ग्राम रोजगार सेवकाचा शासकीय कामात सामाविस्ट करणेबाबत अशा विविध मागण्या सभेमध्ये ग्राम रोजगार सेवकांनी मांडल्या. सभेमध्ये सर्वानुमते दुधरामजी लो. सव्वालाखे (सदस्य जी.प. नागपुर) यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मुख्य सल्लागार म्हणुन नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघर्ष समितीचे सचिव राजेंद्र जिचकार, कार्याध्यक्ष देवदत्तजी साळवे, कोषाध्यक्ष वासुदेव गोतमारे, सहसचिव रंजनजी केवट उपाध्यक्ष बाळू तायडे, नरेंद्रजी अर्भक, तुळशीरामजी बोकडे, दयानंद कांबळे, प्रसिद्धीप्रमुख खुशाल पाटील, नागपूर जिल्हा अध्यक्ष रामगोपाल ढोबळे, भंडारा जिल्हा अध्यक्ष सेवकरामजी नागफासे, रमेश बसिने, कैलास राठोड, मोहन देशमुख, जगदीश उपराडे, सुरेश नागरिकर, अशोक मोहारे, भारत नागपुरे, मोरेश्वर राऊत, विजू तुपाट, राजु, व तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक व ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्रचे पदाधिकारी उपस्थित होते.
रामटेक येथे ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारणी की मीटिंग सम्पन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com