विदर्भ क्रीडा मंडळाला विजेतेपद खासदार क्रीडा महोत्सव : विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धा

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरता सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये काटोल येथील विदर्भ क्रीडा मंडळ संघाने महिला गटात तर काटोल येथीलच विदर्भ युथ क्रीडा मंडळाने पुरुषांच्या गटात विजेतेपद पटकाविले.

विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे मंगळवारी (ता.16) रात्री स्पर्धेची अंतिम लढत पार पडली. यात महिला गटात काटोल येथील विदर्भ क्रीडा मंडळ संघाने यवतमाळ येथील नव हिंद क्रीडा मंडळ संघाचा एका गड्याने पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. तर पुरूष गटात विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोलने विदर्भ क्रीडा मंडळ काटोलचा 4 गुणांनी पराभव करीत बाजी मारली.

14 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात विदर्भ युथ लाडगाव संघाने विदर्भ युथ काटोल संघाचा अवघ्या एका गड्याने पराभव करून जेतेपद पटकाविले. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात विदर्भ युथ लाडगाव संघाने विदर्भ युथ काटोल संघाचा एका गड्याने पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.

दिव्या, नव्या उत्कृष्ट संरक्षक

महिलांमध्ये विदर्भ क्रीडा मंडळ काटोलची खेळाडू दिव्या सावरकर ही उत्कृष्ट संरक्षक तर मराठा फ्रेन्ड्स क्लब अमरावती संघाची ऐश्वर्या ढोके उत्कृष्ट आक्रमक आणि नव जय हिंद क्रीडा मंडळ यवतमाळची प्रिती ठाकरगे ही उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरली. 14 वर्षाखालील मुलींमध्ये छत्रपती युवक क्रीडा प्रसारक मंडळ नागपूरची नव्या दुग्गा उत्कृष्ठ संरक्षक, विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोलची एंजल पर्वत उत्कृष्ट आक्रमक आणि विदर्भ युथ लाडगावची दुर्गा धारवाडे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरली.

निकाल 

महिला 

अंतिम सामना

नवहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ (12) वि. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (13)

नवहिंद – रिना मेश्राम 2.20, 1.0 मि. 1 गडी, आचन काळे 1.0, 2.20 मि., कोमल मडावी 4 गडी

विदर्भ – युक्ती वैद्य 2.0, 1.40 मि. 3 गडी, चैताली गजबे 1.50, 1.40 मि. 2 गडी, दिव्या सावरकर 0.40, 3.20 मि. 1 गडी

विदर्भ क्रीडा मंडळ काटोल एक गड्याने विजयी

उपांत्य फेरी

1. मराठा फ्रेन्ड्स अमरावती (8) वि. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (11)

मराठा – वैशाली ढोके 1.40, 1.50, 2 गडी, मैत्री बागडे 2.0, 1.40, ऐश्वर्या ढोके 2.0, 2.10 मि., 2 गडी

विदर्भ – युक्ती वैद्य 3.0 मि. 3 गडी, चैताली गजबे 1.40, 1.0 मि. 4 गडी, समिक्षा गजबे 2.30, 2.50 मि.

विदर्भ क्रीडा मंडळ काटोल 3 गड्यांनी विजयी

2. नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ (9) वि. अनंत क्रीडा मंडळ अकोला (5)

नव जयहिंद – गुंजन रिवची 2.20, 2.40 मि., 1 गडी, रिना मेश्राम 3.20, 4.40 मि. 1 गडी, प्रिती ठकुरगे 3.20, 1.20 मि.

अनंत – श्रद्धा नागदिवे 3.50, 1.30 मि., 2 गडी, पल्लवी परदे 2.40, 0.20 मि, ज्योति बिरके 1.10, 1.20 मि., 1 गडी

नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ 4 गड्यांनी विजयी

तिसरे स्थान

अनंत क्रीडा मंडळ अकोला (6) वि. मराठा फ्रेन्ड्स अमरावती (8)

अनंत – श्रद्धा नागदिवे 2.30, 4.0 मि., ज्योति बिरके 2.0, 2.10 मि., 1 गडी

मराठा – सलोनी खंडारे 3.10, 1.50 मि., 1 गडी, ऐश्वर्या ढोके 4.0, 2.20 मि., 3 गडी, वैष्णवी ढोके 1.50, 2.1 मि,

मराठा फ्रेन्ड्स क्रीडा मंडळ अमरावती 2 गड्यांनी विजयी

पुरुष 

अंतिम फेरी

विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल (15) वि. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (11)

विदर्भ युथ – फैजान पठाण 3.30,4.40 मि, 5 गडी, प्रशांत पंधरे 1.40, 1.10 मि, 3 गडी

विदर्भ क्रीडा – निकेश निशाद 1.50 मि, 2 गडी, भूषण मेंढे 1.20, 1.40 मि, 2 गडी

विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल 4 गुणांनी विजयी

उपांत्य फेरी

1. तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा (12) वि. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (13)

तुळजाई – नितेश पारधे 5 गडी, विवेक कौडेले 1.40, 1.30 मि.

विदर्भ – शुभम जांभळे 1.10, 1.10मि. 4 गडी, दिलराज सेंगर 2.50, 0.30 मि.

विदर्भ क्रीडा मंडळ काटोल 1 गडी 0.10 मि. राखून विजयी

2. विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल (11) वि. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (10)

विदर्भ – प्रशांत पंधरे 2.40, 2 मि. 1 गडी, फैजान पठाण 2.40, 2.20 मि, 1 गडी

नव महाराष्ट्र – लोकेश भांडवलकर 0.10, 2.30 मि, 3 गडी, शांतनू धारगावे 1.0 मि, 2 गडी

विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल 1 गडी 4.50 मि. राखून विजयी

तिसरे स्थान

तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा (13) वि. नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (12)

तुळजाई – रोशन यिवल 2.0, 2.40 मि, 2 गडी, मनोज घोटेकर 1.30, 2.0 मि. 2 गडी.

नव महाराष्ट्र – ध्रुव ढोके 3.0, 1.30 मि., पियूष नांदुरकर 2.0, 4 गडी

तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा 1 गडी व 1 मिनिट राखून विजयी

14 वर्षाखालील मुली

अंतिम सामना

विदर्भ युथ लाडगाव (16) वि. विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर (15)

विदर्भ युथ – नैतिक शेंद्रे 4.50, 3.20 मि, 1 गडी, ओम वानखेडे 5 गडी

विदर्भ क्रीडा – फैजान शेख 3.0, 1.40 मि, 3 गडी, वीर किरनाके 1.30 मि, 5 गडी

विदर्भ युथ लाडगाव 1 गुणांनी विजयी

14 वर्षाखालील मुले  

अंतिम सामना

विदर्भ युथ लाडगाव (5) वि. विदर्भ युथ काटोल (4)

लाडगाव – दुर्गा घाटवाडे 1.10,4.40 मि., इशा ठाकरे 2.10, 1 गडी

काटोल – एंजल पर्वत 3.0 मि, 1 गडी, निकीता शेंदरे 3 गडी

विदर्भ युथ लाडगाव 1 गड्याने विजयी

उपांत्य फेरी

1. विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर (11) वि. महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (10)

विदर्भ – अनिकेत रंजक 2.40, 0.50 मि, 1 गडी, अंश भगत 0.50, 2.40 मि., 1 गडी.

महाराष्ट्र – आदित्य सोनकुसरे 1.30, 2.50मि. 2 गडी, ओम शेंद्रे 1.40 मि. 3 गडी

विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर 1 गडी व 3.30 मि. राखून विजयी

2. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (14) वि. विदर्भ युथ क्रीडा मंडळ लाडगाव (19)

काटोल – कार्तीक कावडकर 1.30 मि, 3 गडी, हर्ष पांडे 5 गडी.

लाडगाव – शिवम बागडे 2.0, 1.20 मि., जिगर भालेराव 1.0, 1.10 मि, 4 गडी.

विदर्भ युथ क्रीडा मंडळ लाडगाव 5 गड्यांनी विजयी

तिसरे स्थान

विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (14) वि. महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (12)

विदर्भ – पीयूष भलावी 4.10, 1 मि, 3 गडी, हर्ष पांडे 2.20 मि, 3 गडी

महाराष्ट्र – सम्यक वैरागडे 2.20, 0.40 मि. 1 गडी, ओम शेंद्रे 2.0, 0.40 मि. 2 गडी

विदर्भ काटोल 2 गडी व 1.20 मि. राखून विजयी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील श्याम नगर व नवीन नगर पारडी परिसरात आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या शुभहस्ते रस्त्याच्या खडीकरणाचे भूमीपूजन संपन्न

Thu Jan 18 , 2024
नागपूर :- दि. 17 जानेवारी 2024 रोजी पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील शाम नगर व नवीन नगर परिसरात गल्ली क्र. 1. 2. 3. 4 व 5 येथे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद तथा आमदार अॅड. अभिजित वंजारी यांच्या शुभहस्ते त्यांच्याच आमदार निधीतून मंजूर झालेल्या 10 लाख रूपयाच्या रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचे भूमीपूजन ब्लॉक अध्यक्ष  युवराज वैद्य तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख नागरिकांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!