अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील नियमित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, एकत्रित वेतनिक, दैनिक वेतनिक, अंशदायी शिक्षक, परीक्षा विभागातील जॉब वर्कर, उद्यान विभागातील मजूर वर्ग, सुरक्षा रक्षक, सफाईगार, सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिवाळी निमित्त विद्यापीठ अधिसभागृहात संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपहार देण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. विद्यापीठात कार्यरत सर्व कर्मचारी व शिक्षक सातत्याने विद्यापीठाच्या विकासासाठी कार्य करतात. विद्यार्थ्याला सेवा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. दिवाळी निमित्त छोटा उपहार का असेना, तो आज त्यांना सन्मान दिल्या गेला. उपहार वितरणप्रसंगी व्यासपीठावर (संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मोहम्मद अतीक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाल इी तोटे पाटील, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, विभागप्रमुख डॉ. अनिल नाईल, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, उपकुलसचिव (भांडार) विक्रांत मालवीय, सहा. कुलसचिव (आस्था.) डॉ. स्मिता साठे व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते. यावेळी उपहार वितरण कार्यक्रमाला मोठ संख्येने विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.