लवकरात लवकर काढा ई-गोल्ड कार्ड अन्यथा मिळणार नाही ५ लक्ष रुपयांचा मोफत विमा

७२,३९४ पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ २६५१६ नागरीकांनी घेतला लाभ

चंद्रपूर  :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येत आहे.चंद्रपूर मनपा क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ ३७ टक्के म्हणजे २६५१६ नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला असुन शासकीय योजनेचा फायदा मिळण्यास ई-गोल्ड कार्ड नागरीकांनी काढण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

या आरोग्य विम्याच्या माध्यमातून खाजगी व सरकारी रुग्णालयांच्या सहाय्याने एकूण १२०९ उपचार व शस्त्रक्रियांवर मोफत सेवा रुग्णास देण्यात येत आहे. योजनेंतर्गत कॅन्सर,हृदय रोग शस्त्रक्रिया (एन्जिओप्लास्टी,ओपन हार्ट सर्जरी), सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हिप आणि knee ज्यॉइंट रिप्लासिमेंट), मेंदू शस्त्रक्रिया, मूत्रविकार व त्यावरील शस्त्रक्रिया इत्यादी आजारांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत सामाजिक,आर्थिक व जातनिहाय जनगणना-२०११ यादी अनुसार लाभार्थी नागरिकांची निवड ही करण्यात आलेली आहे.

या यादीनुसार चंद्रपूर शहर विभागात एकूण १६,५२७ लाभार्थी कुटुंबांचा समावेश असून ७२,३९४ नागरीक या योजनेचे पात्र लाभार्थी असून आत्तापर्यंत एकूण २६,५१६ लोकांना आयुष्मान कार्ड चे वितरण करण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थाजवळ ‘आयुष्मान कार्ड’ असणे गरजेचे आहे. आयुष्मान कार्ड काढण्याकरीता पात्र लाभार्थी नागरीकांजवळ आधार कार्ड, राशन कार्ड किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे पत्र असणे आवश्यक असून नजीकच्या सी.एस.सी.केंद्र/आपले सरकार केंद्र किंवा जिल्हातील योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये हे कार्ड मोफत बनवून मिळत आहे. चंद्रपूर शहर येथे योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालय सामान्य रुग्णालय,छोटा बाजार, मुसळे रुग्णालय,मानवतकर रुग्णालय,क्रिस्त रुग्णालय, गाडेगोणे रुग्णालय, डॉ.अजय वासाडे रुग्णालय येथे आयुष्मान कार्ड मोफत काढून देण्यात येत आहे.

येथे काढता येईल आयुष्मान कार्ड

● आशा कॉम्पुटर इंदिरा नगर

● उमेश नक्षीने केंद्र इंदिरा नगर

● उमरे सिएससी केंद्र रामनगर

● श्री इंटरनेट केंद्र रामनगर

● आदित्य सर्विस केंद्र बालाजी वार्ड

● सचिन निंबाळकर बालाजी वार्ड

● युवराज पवार केंद्र बाबूपेठ वार्ड

● स्वप्नील वर्भे केंद्र बाबूपेठ वार्ड

● एम.के. सायबर कॅफे केंद्र बागड खिडकी

● ओम प्रकाश कुमरे केंद्र तुकूम

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com