चर्मकार समाजाकरिता विविध कर्ज योजना

भंडारा :- अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार मोची तसेच इत्यादी यांची आर्थिक शैक्षणिक व समाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. महामंडळा मार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या व केंद्र, शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. ही योजना राबविण्यात येत असून 4 हजार 800 लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आलेले आहे.

एन.एस.एफ.डी.सी.नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेस 1 लाख रुपये, 1 लाख 50 हजार व 2 लाख, चर्मोद्योग 2 लाख, लघुऋण वित्त येाजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी 50 हजार या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीकरीता 22.21 कोटी इतका निधी प्राप्त झालेला आहे.

तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सी यांच्या मुदती कर्ज योजना अंतर्गत स्मॉल बिझनेस 5 लाख, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी 1.40 लाख तसेच नवीन महिला अधिकरिता योजना 5 लाख मंजूर झालेल्या आहेत.

एन.एस.एफ.डी.सी यांच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये 20 लाख व विदेशामध्ये 30 लाखापर्यत कर्ज मंजूर करण्यात येईल. अधिक माहिती करिता संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या,भंडारा येथे भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाळे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख,जखमींवर शासकीय खर्चाने उपचार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Wed Jul 12 , 2023
मुंबई :- नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत. खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com