वंचीत बहुजन आघाडी चे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ प्रकरणाने कार्यकर्ते संतप्त!

वाडी पोलिसात तक्रार दाखल,कार्यवाहीची मागणी!

वाडी :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल अतीशय खालच्या पातळीवर शिवीगाळ करून संपुर्ण महाराष्ट्र व देशात अशांतता निर्माण करणाऱ्या जगदीश गायकवाड नामक व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता १८६० च्या कलम ५००,५०१,५०५-२B, १५३A, ५०४ व ५०६ (भाग २) कलमा खाली तक्रार दाखल करून त्वरीत कठोर कारवाई करावी याकरीता वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने रविवारी वाडी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.

यावर कठोर कारवाई न झाल्यास आंबेडकरी समाजाच्या रोषाला सामोरे जाण्यासह आंदोलनात्मक जनउठाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. करिता त्वरीत जगदीश गायकवाड या समाजकंटका विरोधात FIR दाखल करून कठोर कारवाई करा अशी मागणी यावेळी तक्रारीत करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे नागपूर जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे,जिल्हा सचिव अतुल शेंडे,जिल्हा उपाध्यक्ष सुमेध गोंडाणे,सामाजिक कार्यकर्ते मनीष बोरकर, महिला आघाडी जिल्हा सल्लागार लता म्हैसकर,जिल्हा सचिव महानंदा राऊत,रीता उमरेडकर (सरपंच, दवलामेटी),विनय उमाठे, अमित वानखेडे,रोहित राऊत,मनोहर गजभिये, सूनिता बोरकर,माया रामटेके, सुष्मा निमसरकर, साधना नितनवरे,आशा दूपारे इत्यादी कार्यकर्ते उपास्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रिसॉर्ट वाल्यांची मनमानी..

Tue Dec 6 , 2022
नागपूर :- कराडला तिरखुरा रोड मधील भुतारी पुलिया नाल्यामध्ये रिसॉर्टच्या कचरा टाकण्यात आला आहे त्यामुळे पाणी दूषित झाले वेस्टीज कचरा व अन्न टाकल्यामुळे जाणार येणाऱ्या ग्रामस्थांना घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे वास सहन करावे लागत आहे भूतारी पुलिया एफ डी सी एम फॉरेस्ट तसेच ग्रामपंचायत नि वारंवार रिसोड वाल्यांना सांगून सुद्धा त्यांचे मनमानी चालूच आहे त्यामुळे करांडला व तिरखुरा ग्रामस्थांना घाणीचे साम्राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com