संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठीता प्र 3 :- अकरावी प्रवेशाला गती आली असून कामठी येथील एस के पोरवाल महाविद्यालयात अकरावी विज्ञान आणि , अकरावी वाणिज्य (इंग्रजी माध्यम)तसेच बी एस सी प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुणवत्तेच्या तुलनेत विद्यार्थ्यांत स्पर्धा लागली आहे परिणामी कित्येक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून वेटिंग लिस्ट च्या प्रतीक्षेत आहेत.विद्यार्थी व पालकवर्गाची प्रवेशासाठी होत असलेल्या उत्सुकतेचा फायदा घेत महाविद्यालय परिसरातील काही दलाल प्रवेशाच्या नावाखाली मोठी आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद चहांदे यांनी केला आहे.
एस के पोरवाल महाविद्यालयात प्रवेश करून देण्यासाठी दलाल सक्रिय असून हे दलाल विद्यार्थ्यांचे प्रवेश करून देण्याचा नावाखाली विद्यार्थ्याच्या पालकांकडून प्रत्येकी आठ ते दहा हजार रुपये वसुली करीत आहेत.तर ही दलालगिरी संस्थेच्या एका वरिष्ठ पदाधिकारी मार्फत सुरू असल्याचा गंभीर आरोप जिल्हाध्यक्ष प्रा प्रमोद चहांदे यांनी केला असून प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्याची होणारी आर्थिक लूट थांबवित शिक्षणाचा काळाबाजार थांबवावा तेव्हा यासंदर्भात शिक्षण उपसंचालक नागपूर तसेच नागपूर विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करावी अशी मागणी सुदधा करण्यात आली आहे .