५०० वीर सैनिकांना दिली श्रद्धांजली
कन्हान :- महार बटालियन आणि समता सैनिक दल कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने शौर्य दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले .
सर्व प्रथम महार बटालियन माजी सैनिक व समता सैनिक दल द्वारा क्रांती ची मशाल प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . त्यानंतर महार रेजिमेंट चे माजी सैनिक जगदीश कानेकर यांनी यश-सिद्धी स्मृती चिन्ह ला पुष्पचक्र अर्पित करुन ५०० वीर सैनिकांना अभिवादन केले व दूसरा पुष्पचक्र जयवंत गडपाडे यांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभ वर अर्पित करुन अभिवादन केले आणि तिसरा पुष्पचक्र समता सैनिक दलाचे जी.ओ.सी प्रदीप डोंगरे यांनी यश सिद्धी स्मृती चिन्ह पर अर्पित करुन अभिवादन करीत दोन मिनटाचा मौन धारण करुन ५०० वीर सैनिकांना श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर द्वारे महार रेजिमेंट मधील स्थापित समता सैनिक दलाचे निर्माण भूमिके वर सैनिक दलाचे जी.ओ.सी प्रदीप डोंगरे यांनी व महार रेजिमेंटचे माजी सैनिक जगदीश कणेकर यांनी महार बटालियनचा इतिहास आणि भारताच्या सुरक्षेत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर उपस्थितांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाच्या शेवटी महार बटालियन माजी सैनिक व समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांचा संविधान स्तंभ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
या प्रसंगी विनायक वाघधरे , चंद्रशेखर भिमटे , कैलाश बोरकर, रविंद्र दुपारे , रोहित मानवटकर , राजेश फुलझले , विवेक पाटील , नितिन मेश्राम , महेंद्र चव्हान , मनोज गोंडणे ,चेतन मेश्राम , अश्वमेघ पाटील , महेश धोंगडे , नरेश चिमणकर , प्रवीण सोनेकर , अभिजित चांदूरकर , अश्वमेध पाटील , अखिलेश मेश्राम , अखिलेश वाघमारे ,सोनू खोब्रागडे , संदीप शिंदे , गणेश भालेकर ,पंकज रामटेके ,रत्नदीप गजभिये , भगवान नितनवरे , आनंद चव्हण , जितेंद्र टेंभूने ,आदित्य ठेंबुर्णे, करिब खान सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रॉबिन निकोसे , राजेंद्र फुलझले, माजी सैनिक पी.न.पांचभाई , मोहन गावंडे , विलास मेश्राम, जय पाटील ,जयवंत गडपादे ,जगदीश कानेकार ,मानकर सैरसह आदि नागरिकांनी सहकार्य केले .