नागपूर : केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे नागपूर शहरातील १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना गुरुवार १७ मार्चपासून कोर्बेव्हॅक्स लस दिली जाणार आहे. शहरातील शासकीय आणि मनपाच्या १५ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली. बुधवारी (ता.१६) राज्य शासनाकडून कोर्बेव्हॅक्स लस मनपाला प्राप्त झाली.
शहरातील शासकीय व मनपाच्या १७ केंद्रांवर १ जानेवारी २००८ ते १७ मार्च २०१० दरम्यान जन्मलेल्या मुले/मुलींना ही लस देण्यात येईल. यासाठी त्यांना आपले आधार कार्ड किंवा जन्मतारीख नोंद असलेले शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करून किंवा ऑन स्पॉट नोंदणी करण्याची मुभा राहील. लस घेण्यासाठी मुलांचे १२ वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून मान्यताप्राप्त कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस दिले जातील. पहिला डोस घेतल्यानंतर दुस-या डोससाठी ४ आठवड्यांचे अंतर असणे आवश्यक असल्याचेही अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगतिले.
झोननिहाय लसीकरण केंद्र
लक्ष्मीनगर झोन क्र.१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पोटर्स कॉम्प्लॅक्स दीक्षाभूमी व जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. धरमपेठ झोन क्र. २ : बुटी दवाखाना, सदर रोग निदान केन्द्र व तेलंगखेडी आयुर्वेदिक दवाखाना. हनुमाननगर झोन क्र. ३ : मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. धंतोली झोन क्र. ४ : आयसोलेशन हॉस्पीटल आणि एम्स हॉस्पीटल. नेहरूनगर झोन क्र. ५ : ताजबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. गांधीबाग झोन क्र. ६ : राजकुमार गुप्ता समाजभवन. सतरंजीपूरा झोन क्र. ७ : मेंहदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. लकडगंज झोन क्र. ८ : डिप्टी सिग्नल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हिवरीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. आशीनगर झोन क्र. ९ : पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पीटल. मंगळवारी झोन क्र. १० : डिव्हीजनल रेल्वे हॉस्पीटल व इंदोरा प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र