चंद्रपूर – आझादी का अमृत महोत्सव निमित्त युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाद्वारे सुरु करण्यात आलेले ” फिट इंडिया मोबाईल मोबाईल ॲपचा ” वापर करण्याचे आवाहन शासनाद्वारे करण्यात येत आहे. वैयक्तिक प्रशिक्षणासह फिटनेसबाबत मार्गदर्शन प्रदान करणारे हे ॲप असुन फिटनेस प्रती नागरीकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे.
वैयक्तीक जीवनात फार कमी लोक फिटनेसला पुरेसे महत्त्व देतात. दिवसातील जर अर्धा तास फिटनेससाठी समर्पित केला तर शारीरिक व मानसिक आरोग्यही सुदृढ होते. प्ले स्टोअर असणारे हे ॲप मोफत असुन याद्वारे आपण कुठेही आपल्या फिटनेसची चाचणी करू शकतो. खेळाडूंना तंदुरुस्त राहण्यासाठी हे ॲप महत्वाचे आहे आणि त्यांनी ॲपद्वारे दिल्या जाणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे.
सदर ॲप मोबाईलवर ३ भाषेत आणि वेबसाईटवर १४ भाषेत उपलब्ध आहे. या द्वारे आपण दिवसात किती चाललो, किती शारीरिक मेहनत घेतली याचा हिशोब ठेवता येतो. फिटनेससाठी व्यायामाचे वेगवेगळे प्रकार, दिवसात किती जेवण केले, किती कॅलरीज शरीरात आल्या व किती खर्च झाल्या, किती कॅलरीजची आवश्यकता आहे आदी माहिती या ॲपद्वारे जाणता येते व आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवता येते.
अधिकाधिक नागरीकांनी सदर फिट इंडिया मोबाईल मोबाईल ॲप डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिके तर्फे करण्यात येत आहे.
सुदृढ आरोग्यसाठी वापरा फिट इंडिया मोबाईल मोबाईल ॲप
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com