नागपूर ग्रामीण पोलीसांचा आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ तसेच सण व उत्सव संबंधाने रूट मार्च

नागपूर :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ही शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी तसेच आगामी सन उत्सव छत्रपती शिवजयंती (तिथीनुसार), होळी, धुलिवंदन, गुड फ्रायडे, इस्टर संडे हे सन शांततेत पार पडावे या करिता पोलीस स्टेशन जलालखेडा स्तरावरून रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते दरम्यान पोलीस स्टेशन जलालखेडा अंतर्गत काल दिनांक १९/०३/२०२४ रोजीचे १६/३० ते २०/०० वा. पर्यंत जलालखेडा टाऊन, लोहारी सावंगा, भिष्णूर येथे रूटमार्च घेण्यात आला. रूट मार्च दरम्यान सपोनी सी. बी. चौहान, ठाणेदार यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विपीन रामटेके साहेब, तसेच अंमलदार १० व १६ होम सैनिक, रेल्वे पोलीस फोर्सचे ०१ अधिकारी २० कर्मचारी असे एकूण ०३ अधिकारी, ३० पोलिस अंमलदार व १६ होम सैनिक रूट मार्च करिता हजर होते.

सदरची रूटमार्च कार्यवाही हर्ष. ए. पोद्दार (पोलीस अधिक्षक  (नागपूर ग्रा), अपर पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधि. सा. (काटोल वि. काटोल) यांचे मार्गदर्शनात जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि/सी.बी. चौहान व त्यांच्या पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण पोलीसांची महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या अवैध सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक

Thu Mar 21 , 2024
नागपूर :- दिनांक २०/०३/२०२४ रोजी पोलीस स्टेशन केळवद हद्दीत स्टॉफसह पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मौजा खुर्सापार चेकपोस्ट, (बिहाडा फाटा) खापा नरसाळा शिवार NH-47 वर येथे मा. पोलीस अधिक्षक, नागपुर (ग्रामीण) यांचे आदेशाने चालु असलेल्या नाकाबंदी मधील स्टाफसह मौजा खुर्सापार चेकपोस्ट, (बिहाडा फाटा) खापा नरसाळा शिवार NH-47 येथे नाकाबंदी करीत असताना दिनांक २०/०३/२०२४ चे १३/०० वाजता दरम्यान MR […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights