हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण 23 जानेवारीला – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवार, दि. २३ जानेवारी २०२३ रोजी विधानभवनात होणार असल्याची माहिती, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.

तैलचित्र अनावरण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ॲड. नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकप्रिय नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची ओळख व्हावी त्यानुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तैलचित्राचे अनावरण लवकरात लवकर करावे असे निवेदन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना दिले होते. त्या निवेदनानुसार अध्यक्षांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दि. 23 जानेवारी रोजी विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनावरण कार्यक्रमाला देशातील आणि राज्यातील मंत्र्यासह खासदार, आमदार आणि कला, क्रीडा, सिनेसृष्टी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येणार आहे,” अशी माहिती अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आजनीतील रेणुका माता क्रीडा मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक

Thu Jan 19 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नागपुरातील खासदार चषक क्रीडा महोत्सवात शुक्रवार दिनांक-१३ जानवरी ते १७ जानवरीला मानकापूर स्टेडियम येथे झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवात सब ज्युनिअर मुलींच्या गटात कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कामठी तालुक्यातील आजनी येथील नव्याने उदयास आलेल्या रेणुका क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी काटोल येथील साई स्पोर्टिंग क्लबच्या खेळाडूंना तब्बल १९ गुणांच्या फरकाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com