परसाड ग्रामपंचायत उपसरपंच पदाची फेरनिवडणूक बिनविरोध

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नुकतेच 18 डिसेंबर ला कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडली त्यानुसार थेट जनतेतून 27 सरपंच तर 93 प्रभागातून 247 सदस्यांची निवड करण्यात आली.यातील सदस्यमधून निवड करण्यात येणाऱ्या उपसरपंच पदाची निवडणूक तीन टप्प्यात 6 ,9 व 10 जानेवारी 2023 पार पडली होती. यातील परसाड ग्रा प च्या उपसरपंच पदाची निवडणूक ही वादग्रस्त ठरली असल्याने आक्षेपकर्त्यांचा आक्षेप न नोंदविता सभा अध्यक्ष यांनी आक्षेप नाकारण्याचा निर्णय घेताना त्यासाठीचे कारण नमूद करणे पारदर्शक निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक होते परंतु सभा अध्यक्ष यांनी कुठलेही कारण नमूद न करता केवळ आक्षेप नाकारण्यात येत असल्याचे नमूद केले.त्यामुळे सदर निवडणूक ही महाराष्ट्र ग्रा प अधिनियम 1958 चे कलम 30-अ उपसरपंच पदाची निवडणूक योग्य रित्या व पारदर्शक पणे पार पडण्यात आले नसल्याचे दिसून येत नसल्याने 10 जानेवारीला झालेली परसाड ग्रा प उपसरपंच पदाची निवडणूक ही अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्या आदेशानव्ये रद्द करण्यात आली होती या उपसरपंच पदाची फेरनिवडणूक आज 23 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता ग्रा प सभागृहात निवडणूक निरीक्षक मनीष दिघाडे यांच्या मुख्य उपस्थितीत घेण्यात आली ज्यामध्ये सात सदस्यांपैकी तीन सदस्य अनुपस्थित होते तर उपस्थित चार सदस्यापैकी एकाच उमेदवाराने उमेदवारी अर्ज सादर केले होते त्याविरोधात कुणीही उमेदवारी अर्ज सादर न केल्याने उपसरपंच पदी सुरेश डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  -प्राप्त माहितीनुसार 10 जानेवारी 2023 ला दुपारी 2 वाजता सात सदस्यीय ग्रा प उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच मनोज कुथे यांच्या अध्यक्षतेखाली व निवड निरीक्षक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कामठी सहाय्यक निबंधक अनिल गोस्वामी यांच्या मुख्य उपस्थितीत घेण्यात आली होती.या उपसरपंच पदासाठी सुरेश डोंगरे व पुष्पलता भगत या दोघांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते.झालेल्या गुप्त मतदानानुसार अध्यक्षांनी मतमोजणी सुरू केल्या नंतर एका मतपत्रिकेवरील चिन्ह बरोबर नसल्याचे पुष्पलता नितीन भगत,वैशाली वाघमारे, अर्चना चौधरी,विकास अतरकर यांनी आक्षेप नोंदविला परंतु अध्यक्ष सरपंचांनी आक्षेप नाकारला त्यानुसार दोन्ही सुरेश डोंगरे व पुष्पलता भगत या उमेदवारास समसमान चार मते मिळाली व सरपंचांनी आपला निर्णायक मत सुरेश डोंगरे यांना दिल्यामुळे यांना पाच मते मिळाली व उपसरपंच पदी निवड झाली.मात्र तक्रारीवरून अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी ही उपसरपंच पदाची निवडणूक रद्द ठरवीत दिलेल्या आदेशानुसार फेरनिवडणूक आज 23 फेब्रुवारीला घेण्यात आली.ज्यांमध्ये उपसरपंच पदी सुरेश डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. 

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अहेरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त "मिलेट की डायट, यही है राईट" कार्यशाळेचे आयोजन...

Thu Feb 23 , 2023
गडचिरोली : अहेरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त “मिलेट की डायट यही है राईट” या कार्यशाळेचे आयोजन कन्यका माता मंदिर सभागृह येथे कृषी विभागामार्फत करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी अहेरी प्रक्षेत्राचे विधानसभा सदस्य तथा माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे उपविभागीय कृषी अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com