अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने पाचही जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांसाठी आविष्कार स्पर्धेचे आयोजन विद्यापीठामध्ये दि. 16 व 17 डिसेंबर, 2022 या दरम्यान करण्यात आले आहे. विद्याथ्र्यांमध्ये संशोधन दृष्टीकोन निर्माण करणे, त्यांच्या नवनवीन कल्पनांना आणि शोधक वृत्तीला चालना देणे, व्यक्ती, समाज, देश आणि संपूर्ण जग विविध क्षेत्रांतील समस्यांवरील संशोधनामुळे प्रगतीशील असून दिवसेंदिवस होत असलेल्या संशोधनाचा फायदा सर्वांना होत आहे. आविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून उदयोन्मुख संशोधक निर्माण होतात, त्यादृष्टीने या स्पर्धांना खूप महत्वाच्या आहेत.
विद्यापीठस्तरीय स्पर्धांच्या आधी महाविद्यालयीन स्तरावर सदर स्पर्धा होणार आहे. दि. 12 डिसेंबर रोजी पी.आर. पोटे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड मॅनेजमेंट, अमरावती येथे अमरावती जिल्ह्राकरीता, दि. 10 डिसेंबर रोजी श्री आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे अकोला जिल्ह्राकरीता, दि. 13 डिसेंबर रोजी पंकज लद्धड इन्स्टि ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट स्टडीज, बुलढाणा येथे बुलढाणा जिल्ह्राकरीता, दि. 10 डिसेंबर रोजी एम.एस.पी. कला, विज्ञान आणि के.पी.टी. वाणिज्य महाविद्यालय, मानोरा, वाशिम येथे वाशिम जिल्ह्राकरीता, तर दि. 14 डिसेंबर रोजी अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ येथे यवतमाळ जिल्ह्राकरीता जिल्हास्तरीय आविष्कार संपन्न होतील.
विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी अमरावती जिल्ह्राकरीता प्राचार्य डॉ.डी.टी. इंगोले व समन्वयक डॉ. सोमदत्त तोंद्रे, अकोला जिल्ह्राकरीता प्राचार्य डॉ.व्ही.डी. नानोटी व समन्वयक डॉ.पी.टी. अग्रवाल, बुलढाणा जिल्ह्राकरीता प्राचार्य डॉ.पी.एम. जावंधिया व समन्वयक एस.एम. दांडगे, वाशिम जिल्ह्राकरीता प्राचार्य डॉ. एन.एस. ठाकरे व समन्वयक डॉ.एम.एन. इक्बाल, तर यवतमाळ जिल्ह्राकरीता प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा व समन्वयक डॉ.ए.बी. लाड यांचेशी विद्याथ्र्यांनी संपर्क साधावयाचा आहे.
श्रेणी 1 – मानवता, भाषा आणि ललीत कला, श्रेणी 2 – वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, श्रेणी 3 – शुद्ध विज्ञान, श्रेणी 4 – कृषी व पशुसंवर्धन, श्रेणी 5 – अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, तर श्रेणी 6 – औषध आणि फार्मसी या वर्गवारीमध्ये सदर स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. पदवी, पदव्युत्तर आणि पोस्ट पदव्युत्तर वर्गवारीमध्ये सदर स्पर्धा होत असून दि. 12 डिसेंबर, 2022 पर्यंत ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांना आपले प्रवेश पाठवावयाचे असल्याचे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. वैशाली धनविजय यांनी कळविले आहे. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नोडल अधिकारी आय.आय.एल.च्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर यांच्या समन्वयाने सदर स्पर्धांचे आयोजन होत आहे. तरी जास्तीतजास्त विद्याथ्र्यांनी आविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.