विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  

कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक संपन्न

मुंबई : विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शैक्षणिक शुल्क समितीची अध्यक्ष विजय अचलिया, माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उपसचिव अजित बाविस्कर,उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थिती नुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण सहज आणि सुलभ उपलब्ध होणे महत्वाचे आहे. यासाठी सर्वांचे मार्गदर्शन आणि साथ महत्वाची आहे, शैक्षणिक अडचणी आणि त्यावर उपाययोजनासाठी विद्यापीठ आणि राज्य शासन यांनी समनव्यातुन कार्य करावे असेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

परीक्षा, निकाल, आणि शैक्षणिक वेळापत्रक याचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे परीक्षा वेळापत्रक,परीक्षेत निकाल वेळेत जाहीर करणे, सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि निकाल ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठाने नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्री पाटील म्हणाले,राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा दि.३१ मे पर्यत कशा पूर्ण होतील याचे नियोजन करून दि.३० जून पर्यत निकाल जाहीर करावेत. जुन-जुलै मध्ये सीईटी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दि.१ ऑगस्ट पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करावे. विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करावे.त्यामुळे विद्यार्थ्यांना राज्याबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध होण्यास मदत होईल. आणि विद्यार्थ्यांचा मानसिक त्रासही कमी होईल.

विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेच पाहिजे. ज्या महाविद्यालयांना पाच वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. त्यांनी नॅक मूल्यांकन प्रक्रिया केली नाही. अशा महाविद्यालयाचे प्रथम वर्ष प्रवेश बंद करण्यात येथील. तसेच नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमध्ये अधिकाधीक स्पष्टता आणून येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणीला गती द्यावी.

उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी संख्या विशेषत: महिलांची संख्या वाढविण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत.यासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल असेही पाटील यांनी सांगितले.

या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  रस्तोगी यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सद्या:स्थिती याबाबत सादरीकरण केले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम, पुस्तक, शैक्षणिक साहित्य मराठीमध्ये उपलब्ध होण्यासाठी आयआयटी मुंबईच्या ‘उडाण’ प्रकल्पाबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

108th Indian Science Congress, Challenge to make gene therapy affordable: Dr Shubha Phadke  

Fri Jan 6 , 2023
NAGPUR : Gene therapy is available in India but making it affordable for common people is a major challenge, said Dr Shubha Phadke, known as one of the pioneers of medical genetics in India. Dr. Phadke, who is Professor and Head, Department of Medical Genetics, Sanjay Gandhi PG Institute of Medical Sciences, Lucknow, was here to address a session during […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com