संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठीत कांग्रेस तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
कामठी :- जगातील इतर देशात जात धर्म पंथ आणि आर्थिक विषमतेमुळे तुकडे पडत असून आपल्या देशात मात्र भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधाना मुळे राष्ट्रीय एकात्मता कायम आहे असे प्रतिपादन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले.
कांग्रेस द्वारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जयस्तभं चौक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर व माजी जी प अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रामुख्याने कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे, कुसुम खोब्रागडे,कांग्रेस शहराध्यक्ष रमेश दुबे, माजी नगराध्यक्ष नीरज यादव, माजी नगराध्यक्ष गुड्डू मांनवटकर,माजी नगरसेविका ममता कांबळे,राजेश कांबळे,राजकुमार गेडाम, आशिष मेश्राम ,प्रमोद खोब्रागडे,मो सुलतान,आनंद खोब्रागडे आदी उपस्थित होते.