गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीवर युनिट क्र 5 च्या गुन्हे शाखा विभागाची धाड..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-38 गोवंश जनावरे जप्त,47 लक्ष 24 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

कामठी ता प्र 5:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जबलपूर महामार्गावरील लिहिगाव गावाजवळून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असूनही नवीन कामठी पोलिस विभाग कुंभकर्णी झोपेत आहे त्यामुळे नविन कामठी पोलिसांच्या नाकावर निंबु टिचून नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्र 5 च्या पथकाने मध्यरात्री अडीच दरम्यान लिहिगाव गावाजवळून होत असलेल्या गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीवर धाड घालण्याची यशस्वी कारवाही केली असून या कारवाहितुन दोन सहा चाकी ट्रक मध्ये कोंबून असलेले 38 गोवंश जनावरे ज्यात एक मृत पावलेल्या जनावराचा समावेश आहे .दोन सहाचाकी ट्रक असा एकूण 47 लक्ष 24 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपीना अटक करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळ मार्गे अवैध गोवंश जनावरांची अवैध वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट क्र 5 च्या पोलिस पथकाला मिळताच पोलिसांनी यशस्वीरीत्या सापळा रचून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारे सहा चाकी ट्रक क्र एम एच 37 टी 3002 व एम एच 37 टी 3015 वर धाड घालून त्यात निर्दयतेने कोंबून असलेले 38 गोवंश जनावरे ताब्यात घेण्यात आले त्यात एक गोवंश जनावर मृत असल्यामुळे कत्तलीसाठी जात असलेल्या 37 गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून गोवंश जनावरांना जीवनदान देण्यात आले.या कारवाहितुन 40 लक्ष रुपये किमतीचे दोन सहा चाकी ट्रक ,38 गोवंश जनावरे किमती 7 लक्ष 24 हजार रुपये असा एकूण 47 लक्ष 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपीना ताब्यात घेत त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.अटक चार आरोपीमध्ये रुपेश लहेकर वय 32 वर्षे , ज्ञानेश्वर तावके वय 34 वर्षे ,सखाराम सावके वय 74 वर्षे,दुर्गेश सुर्वे वय 26 वर्षे सर्व रा.ता मगरुडपीर जिल्हा वाशीम असे आहे.

ही यशस्वी कारवाही गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त , पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे युनिट क्र.०५ गुन्हे शाखा,यांच्या मार्गदर्शनार्थ सहायक पोलिस निरीक्षक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक कोहळे, पोहवा प्रमोद वाघ,बांबल, महादेव, कारेमोरे, राठोड,नापोशी राजू टाकळकर, टप्पुलाल,निखिल,चेतन जाधव,नितीन, यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रिआंती इंग्लिश स्कुल अंड ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा १००% निकाल..

Mon Jun 5 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार सोहळा.. कामठी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च 2023 च्या परीक्षेत प्रिआंती इंग्लिश स्कुल अंड ज्युनिअर कॉलेज तरोडी (बु) ता.कामठी जि.नागपूर या माध्यमिक शाळेचा 100% निकाल लागला आहे . परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विध्यार्थी व पालकांचा गुणगौरव व सत्कार सोहळा आज शाळेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!