पॉझिटीव्ह जर्नालिझम अवॉर्डसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज पाठवा !‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आवाहन

मुंबई :- पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पॉझिटिव्ह जर्नालिझमसाठी पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. २०२३ पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे.त्यापूर्वी अर्ज पाठविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकारांसाठी चांगले करण्याच्या उद्देशाने राज्यातील २० संपादकांनी एकत्रित येऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची निर्मिती झाली आहे. आज जगभरात चाळीस हजारांपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेली ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ही एकमेव संघटना आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही २१ देशांपर्यंत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही पत्रकारांची संघटना पोहोचली आहे. या संघटनेने पत्रकारांच्या पंचसूत्रीसह इतर समस्यांसोबतच सकारात्मक पत्रकारितेसाठीही पुढाकार घेतला आहे. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, ग्रंथ व मानपत्र असा आहे, तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ६१ हजार रुपये, महिला पत्रकारांसाठी ५१ हजार रुपये व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ४१ हजार रुपये रोख, तसेच स्मृतिचिन्ह, ग्रंथ व सन्मानपत्र असे आहे. या पाच प्रकारांमध्ये पत्रकारांनी सहभागी व्हावे. सहभागी होणाऱ्या पत्रकारांनी दैनिक व साप्ताहिकाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडावे. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक बातम्या, लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्र व मराठी भाषेपूर्तीच मर्यादित आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे मुख्य पदाधिकारी मंदार फणसे, संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, अनिल म्हस्के, विलास बढे, सुधीर चेके पाटील व बालाजी मारगुडे हे निवड प्रक्रियेचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. पत्रकारांनी आपले प्रस्ताव थेट ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ कोकण विभागीय कार्यालय, एल. ३०-१२०१ स्वप्नपूर्ती, सेक्टर- ३६, खारघर, नवी मुंबई या पत्त्यावर १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाठवायचे आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी आर्थिक वर्षाकरीता 456 कोटी मंजूर

Wed Feb 7 , 2024
– ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे 152 कोटींची वाढ – जिवती आकांक्षित तालुका म्हणून घोषित; विशेष बाब म्हणून 5 कोटी मिळणार चंद्रपूर :- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे आगामी 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी 456 कोटी रुपये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com